आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Big-budget marathi movie “Ankush” to release in January 2023. मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या पहिल्याच निर्मितीद्वारे श्री राजाभाऊ घुले यांनी दमदार असे पदार्पण केले आहे. त्यांच्या ओमकार फिल्म्स क्रिएशन द्वारे त्यांनी मराठीतील तगडी स्टारकास्ट आणि तंत्रज्ञांना घेऊन बिगबजेट अशा “अंकुश” चित्रपटाची निर्मिती केली आहे. जानेवारी २०२३ मध्ये “अंकुश” हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. 

केवळ एकच चित्रपट न करता मराठी सिनेसृष्टीत वेगवेगळे मनोरंजक चित्रपट निर्मिती करण्याचे त्यांचे ध्येय आहे. “अंकुश” चित्रपटात उत्तम असे साहस दृश्य पहिल्यांदाच मराठीत दिसणार आहेत जी केली आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि के जी एफ चित्रपटाचे ऍक्शन डायरेक्टर विक्रम मोर यांनी. मराठीतील दिग्गज संगीतकार अमितराज आणि चिनार- महेश या सिनेमाचे संगीत करत आहेत, हिंदी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमर मोहिले यांनी या चित्रपटाचे पार्श्वसंगीत केले आहे. सुंदर अशी गीते मंगेश कांगणे आणि मंदार चोळकर यांनी लिहिली आहेत. नागराज दिवाकर यांचे छायांकन तसेच अनेक पुरस्कार प्राप्त संकलक निलेश गावंड यांनी या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी सांभाळलेली आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर, तर कार्यकारी निर्माता म्हणून विशाल चव्हाण यांनी काम पहिले आहे. या चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांची असून पटकथा व संवाद निशांत नाथाराम धापसे आणि नामदेव मुरकुटे यांचे आहेत, तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटांचे लेखक सह दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकीय पदार्पण करत आहेत.

“अंकुश” हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये नवीन वर्षाच्या सुरवातीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या काही दिवसात चित्रपटांच्या कलाकारांची सुद्धा घोषणा होईल असे निर्माते राजाभाऊ घुले आणि दिग्दर्शक निशांत नाथाराम धापसे यांनी बोलतांना सांगितले. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.