आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Amazon Prime Video’s upcoming series ‘Cinema Marte Dum Tak’ trailer released, premiering on January 20 on Prime Video

भारतीय दर्शकांसाठी सर्वात पसंतीचे मनोरंजन डेस्टिनेशन असलेल्या अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज आपल्या अनस्क्रिप्टेड अमेझॉन ओरिजनल सिरीज ‘सिनेमा मरते दम तक’च्या ट्रेलर लाँचसह याच्या ग्लोबल प्रीमियरची घोषणा केली. या सिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांना ९० च्या दशकात परत घेऊन जातो. ज्यामध्ये, हिंदी पल्प सिनेमाच्या जगातील सर्वात मनमोहक, आनंदी आणि पडद्यामागील न पाहिलेल्या दृश्यांची झलक मिळते, ज्याचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. तसेच, व्हाइस स्टुडिओज प्रॉडक्शनद्वारा प्रोड्यूस केलेली आणि वासन बालाद्वारा निर्मित, सहा भागांची असेलेल्या या रिअ‍ॅलिटी डॉक्यूमेंट्री-सिरीजमध्ये पहिल्यांदा 90 च्या दशकातील पल्प सिनेमा इंडस्ट्रीतील ग्लिझ आणि इंडिपेंडेंट इकोसिस्टमची झलक दाखवण्यात आली आहे.

तसेच ‘सिनेमा मरते दम तक’ या डॉक्यूमेंट्री-सिरीजमध्ये रझा मुराद, मुकेश ऋषी, हरीश पटेल आणि राखी सावंत या कलाकारांना पाहायला मिळणार असून, ते भारतीय सिनेमाच्या अशा पैलूंवर आपले विचार व्यक्त करतील ज्याबद्दल दर्शकांना फार कमी माहित आहे. अशातच, व्हाइस स्टुडिओज प्रॉडक्शनद्वारा प्रोड्यूस केलेली, वासन बालाद्वारा निर्मित आणि दिशा रंदानी, झुल्फी आणि कुलिश कांत ठाकूर सह-दिग्दर्शित असलेली ही सिरीज 20 जानेवारी रोजी भारत तसेच जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होण्यासाठी साज आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.