यूट्यूबवर भक्ती वाहिनीची केली सुरुवात.

पद्मश्री सुरेश वाडकर हे भजन आणि अभंगांपासून मंत्र, आणि स्तोत्रांपर्यंत त्यांच्या भक्ती संगीतासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर, प्रख्यात संगीतकार पद्मश्री सुरेश वाडकर यांनी यूट्यूबवर सुरेश वाडकर भक्ती ही वाहिनी मारुती स्तोत्र सादर करून लाँच केली. सुरेश वाडकर आणि त्यांचा विद्यार्थी पद्मनाभ यांनी गायलेले मारुती स्तोत्र  दुपारी बारा वाजता रिलीज करण्यात आले. (Padma Shri Suresh Wadkar releases Maruti Stotra, launches Suresh Wadkar Bhakti Channel on Hanuman Jayanti)
Padma Shri Suresh Wadkar releases Maruti Stotra, launches Suresh Wadkar Bhakti Channel on Hanuman Jayanti
मारुती स्तोत्र किंवा हनुमान स्तोत्र हे १७  व्या शतकातील महाराष्ट्रातील संत कवी समर्थ रामदास यांनी मराठी भाषेत रचलेले स्तोत्र आहे. यात मारुती नंदन किंवा भगवान हनुमानाच्या अनेक पैलू आणि गुणांचे वर्णन केले गेले आहे.
सुरेश वाडकर भक्ती वाहिनीवर सुरेश वाडकर यांच्या विद्यार्थ्यांसह अन्य विविध संगीतकार, गायक त्यांनी तयार केलेली भक्तिगीते गाताना दिसणार आहेत. यासोबततच सुरेश वाडकर यांनी आजिवासन स्टुडियोचीही सुरुवात केली असून आजिवासन भक्ती आणि आजिवासन साऊंड नवीन टँलेंटला यावर संधी देणार आहेत.
 
भक्ती वाहिनीची सुरुवात करीत असताना याबाबत आनंद व्यक्त करीत सुरेश वाडकर यांनी म्हटले, आता मी माझ्या पहिल्या प्रेमावर म्हणजेच भक्ती संगीतावर लक्ष केंद्रित करू शकणार आहे. मला हे खूप अगोदर सुरु करायचे होते पण मी माझे रेकॉर्डिंग्ज, कार्यक्रम आणि आमच्या संगीत अकादमीत व्यस्त होतो. आता माझी पत्नी पद्मा पूर्णपणे अकादमीची व्यवस्था पाहात आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या कोरोना  साथीमुळे मला स्वत:साठी बराच वेळ मिळाला. या काळात मी या भक्ती वाहिनीवर काम करण्यास सुरुवात केली आणि मला आनंद आहे की हनुमानाच्या आशीर्वादाने हे काम सुरु झाले असेही त्यांनी सांगितले.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.