आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Roop Nagar Ke Cheetey’ won the Outstanding Achievement Award for Best Storyline at the Jaisalmer International Film Festival. एस एंटरटेन्मेंट बॅनरच्या ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाला ‘जैसलमेर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ उत्कृष्ट कथानकासाठी ‘आऊटस्टँडिंग अचिव्हमेंट अवॉर्ड’ मिळाला आहे.

या पुरस्काराबरोबरच ‘टागोर आंतरराष्ट्र्रीय चित्रपट महोत्सव’, ‘इंडो फ्रेंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ आणि ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ ही आपली छाप सोडली आहे. ‘बेस्ट नरेटिव्ह फीचर फिल्म’ साठी ‘टागोर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समीक्षकांचा विशेष पुरस्कार ‘रूप नगर के चीते’ चित्रपटाला मिळाला असून ‘इंडो फ्रेंच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ ‘बेस्ट इंडियन फिचर फिल्म’, संगीत आणि उत्कृष्ट छायाचित्रणासाठी चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ चित्रपटाची निवड झाली आहे. तसेच ‘महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ ज्युरीने शिफारस केलेल्या ‘आयकॉनिक भारत गौरव पुरस्कार २०२२ (IGBP)’ साठी पुरस्कार विजेते म्हणून ही चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ‘लिफ्ट-ऑफ ग्लोबल नेटवर्क सेशन्स २०२३ मध्ये चित्रपटाची अधिकृतपणे निवड झाली आहे, हा आघाडीच्या जागतिक ऑनलाइन चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे.

खरी मैत्री, म्हणजे आनंदाचा ठेवाच, पण या जिगरी दोस्तीत कधीकधी अनबनही होतेच. ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटातून हाच विषय रंजकपणे मांडला आहे. या चित्रपटात करण परब आणि कुणाल शुक्ल, हेमल इंगळे, मुग्धा चाफेकर आयुषी भावे, सना प्रभु, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, रजित कपूर या कलाकारांच्या भूमिका आहेत.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.