आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

लावणीसम्राट आशिष पाटील, नृत्यदिग्दर्शिका मेघा संपत आणि नृत्यांगना सुकन्या काळण यांच्या उपस्थितीत रंगणार उत्सव वारसा संस्कृतीचा २०२१” (A festival celebrating the heritage of folk art in Maharashtra “Varasa Sanskruticha 2021″)

लोककला जपण्यासाठी सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये लोकनृत्य, लोकगीत, लोकसंगीत, पथनाट्य, चित्रकला अशा विविध कलांचा समावेश आहे.  २०१७ पासून सुरु  झालेल्या मिरीयाड आर्ट्स मार्फत काही वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम राबवले जात आहेत. हे यंदाचे पाचवे पर्व आहे.  प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मेघा संपत, नृत्यांगना आणि अभिनेत्री सुकन्या काळण आणि लावणीसम्राट आशिष पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवणार आहेत. २ ऑक्टोबर २०२१ रोजी ऑनलाईन माध्यमातून पाहता येणार आहे. ज्या कलावंताने आपल्या लोककलेचा वारसा पुढे अविरत पुढे चालवला आहे अशा लोककलावंताला वारसा तर्फे सन्मानित करण्यात येते. यावर्षी देखील एक कलावंत निवडून लावणीसम्राट आशिष पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.

कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी धोका मात्र अजूनही टळलेला नाही त्यामुळे राज्यसरकारच्या आदेशाचे सर्व नियम पळून या वर्षी देखील ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. या ऑनलाईन होणाऱ्या स्पर्धेचा निकाल २ ऑक्टोबर रोजी संस्थेमार्फत होणाऱ्या लाईव्ह इव्हेंट मध्ये घोषित करण्यात येणार आहेत.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.