इंदू की जवानीचे ट्रेलर आउट! बघा इथे!

कियारा अडवाणी आणि आदित्य सील यांच्या रोमँटिक कॉमेडी ‘इंदू की जवानी’ चे  ट्रेलर आज रिलीज झाले आहे. अबीर सेनगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात मल्लिका दुआ देखील मुख्य भूमिकेत आहे. इंदू की जवानी रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून कथानकात येणाऱ्या विनोदी व गोंधळलेल्या वळणानुसार यात विनोदनिर्मिती करण्यात आली असल्याचे ट्रेलरवरून दिसते.
हा चित्रपट कियाराचे पात्र इंदू गुप्ताच्या भोवती फिरत आहे, जी गाझियाबादची आहे. तिने डेटिंग अ‍ॅपने केलेले प्रयोग तिच्या आयुष्यात कसे विनोदी ट्विस्ट आणतात यावर सारे कथानक केंद्रित आहे. इंदू थोडीशी मजा करण्याचा विचारात जेंव्हा हे ऍप वापरते तेंव्हा ती एका पाकिस्तानी माणसाला भेटते व तिचे आयुष्य बदलते.

इंदू की जवानी विषयी बोलताना कियारा अडवाणी म्हणते की, “इंदू प्रत्येक तरुण भारतीय मुलीचे प्रतिनिधित्व करते. ती प्रेमळ आणि विचित्र आहे.”
‘इंदू की जवानी’ चे शुटींग गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लखनौ येथे सुरु झाले व प्रदर्शन ५ जून २०२० रोजी होणार होते. तथापि, कोरोना व्हायरस आजारामुळे ते पुढे ढकलले गेले. मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, निकिल आडवाणी, निरंजन अय्यंगर आणि रायन स्टीफन निर्मित, इंदू की जवानी ११ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
Website | + posts

Leave a comment