आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

The hilarious trailer of the Marathi Movie “Dil Dimag Aur Batti” released. सा क्रिएशन्स निर्मित “दिल दिमाग और बत्ती”  या मराठी चित्रपटाचे हटके ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आले. ७० ते ९० च्या दशकातील इस्टमन कलर मसाला चित्रपटांची आठवण करून देणारे हे ट्रेलर असून मराठी सिनेमा इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग या चित्रपटात आहे. “दिल दिमाग और बत्ती” २२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार  आहे.

सा क्रिएशन्स ची पहिलीच निर्मिती असलेल्या “दिल दिमाग और बत्ती” या मराठी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते आहेत. सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, संस्कृती बालगुडे, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटात हृषीकेश गुप्ते यांनी लिहिलेल्या गाण्यांना अवधूत गुप्ते यांनी स्वरसाज चढवला आहे तर छायांकन सलील सहस्त्रबुद्धे यांचे आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.