आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Sher Shivraj’ movie team at Pratapgad. ढोल-ताशांचा गजर, शाहिरी पोवाडे, डफाची थाप, गोंधळ, जागरण आणि छत्रपती शिवरायांचा जयघोष अशा भारावलेल्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात ‘शेर शिवराज’ चित्रपटातील कलाकारांचे साताऱ्यातील स्थानिकांनी जंगी  स्वागत केले. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सातारा दौऱ्यावर असणाऱ्या चित्रपटाच्या टीमने यावेळी प्रतापगडाला भेट दिली.

प्रतापगडावरील भवानीमातेचा आशीर्वाद घेत इतिहासाचे आणि चित्रपटातील किस्स्यांचे अनेक पैलू यावेळी चित्रपटातील कलाकारांनी उलगडले. याप्रसंगी ‘शेर शिवराज’ चित्रपटातील अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, विक्रम गायकवाड, अक्षय वाघमारे आणि निर्माते प्रद्योत पेंढरकर, नितीन केणी उपस्थित होते. गडकोटांच्या संवर्धनासाठी अग्रेसर असणारे सह्याद्री प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे यांच्या कार्याला सलाम म्हणून ‘शेर शिवराज’ चित्रपटाचे निर्माते चिन्मय मांडलेकर, प्रद्योत पेंढरकर, नितीन केणी यांनी श्रमिक गोजमगुंडे यांना धनादेश सुपूर्द केला.

शिवचरित्रातील अफजलखान वधाच्या महत्त्वपूर्ण अध्यायामध्ये प्रतापगडाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. येत्या २२ एप्रिलला ‘शेर शिवराज’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या पार्श्वभूमीवर ‘शेर शिवराज’ चित्रपटातील कलाकारांनी माध्यम प्रतिनिधींसह प्रतापगडाला भेट देत हा इतिहास पुन्हा जिवंत केला. लेखक–दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी यावेळी प्रतापगड आणि अफजलखान वधाच्या चित्तथरारक घटनाक्रमाची माहिती उपस्थितांना दिली. शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची, संयम, शिष्टाई आणि चतुराई या अद्भुत गुणांचे दर्शन ‘शेर शिवराज’ या चित्रपटातून घडणार आहे. त्याआधी चित्रपटाच्या टीमने राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांची ‘जलमंदिर पॅलेस’ सातारा येथे सदिच्छा भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.

Sher Shivraj Movie Team paid a courtesy call on Rajmata Shrimant Chhatrapati Kalpanaraje Bhosale at Jalmandir Palace, Satara

‘शेर शिवराज’ चित्रपटाची निर्मिती मुंबई मुवी स्डुडिओजचे नितीन केणी, राजवारसा प्रोडक्शनचे प्रद्योत पेंढरकर व अनिल नारायणराव वरखडे, तसेच मुळाक्षरचे दिग्पाल लांजेकर व चिन्मय मांडलेकर यांची आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, वर्षा उसगांवकर, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अक्षय वाघमारे, विक्रम गायकवाड, आस्ताद काळे, सुश्रूत मंकणी, दीप्ती केतकर, माधवी निमकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

ज्यामुळं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना झाली असं आपण म्हणू शकतो, तो अफझलखान वधाचा ऐतिहासिक सुवर्णअध्याय २२ एप्रिलला ‘शेर शिवराज’ चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.