आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

मागच्या आठवड्यात डिजनी+हॉटस्टारवर ‘सनक- होप अंडर सीज’च्या (Sanak) प्रदर्शनाची घोषणा केल्यानंतर आज, निर्माते – विपुल अमृतलाल शाह आणि झी स्टूडियोज या होस्टेज ड्रामाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे, ज्यामध्ये विद्युत जामवाल (Vidyut Jammwal), बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा, नेहा धूपिया आणि चंदन रॉय सन्याल मुख्य भूमिकेत असणार आहेत. कनिष्क वर्मा दिग्दर्शित ‘सनक’ येत्या दसऱ्याला, म्हणजेच 15 ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे. (‘Sanak’ starring Vidyut Jammwal will be screened on Disney + Hotstar on October 15)

 तारखेच्या घोषणेसोबतच, निर्मात्यांनी चित्रपटाचे नवे पोस्टर देखील प्रदर्शित केले आहे. ज्यात अभिनेता विद्युत जामवाल, एका हातात मूल आणि दुसऱ्या हातात बंदूक घेऊन समोर येतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

आपला उत्साह व्यक्त करताना विपुल शाह म्हणाले की, “कोविड -19 च्या सर्वात कठीण परिस्थितीत आम्ही शूट केलेल्या ‘सनक’ची तारीख जाहीर करताना मला खूप आनंद होत आहे. या आमच्या सर्व प्रयत्नांचा एकमेव उद्देश्य लोकांचे मनोरंजन करत रहाणे हा असून आम्ही नेहमीप्रमाणेच, आम्ही एक्शनला कमांडो मालिकांच्या एक पायरी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे की आम्ही ते साध्य केले आहे.”

ते पुढे म्हणाले, “मला आशा आहे की प्रेक्षकांना ‘सनक’मधील एक्शन आणि इमोशन्स पाहून असेच वाटेल. हा रतीय चित्रपटसृष्टीत एक नवीन स्थान निर्माण करेल; हा एक होस्टेज ड्रामा आहे, एक अशी शैली, ज्याला संपूर्ण क्षमतेनिशी अद्याप दर्शवण्यात आलेले नाही. एका ओलीस ठेवलेल्या हॉस्पिटलमध्ये एक्शन आणि उलगडत जाणारे नाट्य पाहणे मनोरंजक असेल. ही तारीख शेअर करताना आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर चित्रपट रिलीज होण्याची मी देखील वाट पाहतो आहे. आम्हाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळेल अशी आशा आहे.”

या चित्रपटातून बंगाली चित्रपटसृष्टीत प्रचंड लोकप्रियता मिळवणारी सुंदर अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे.

विपुल शाह यांनी, सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडसोबत अनेक उत्तम सिनेमांसोबत दर्शकांचे मनोरंजन केले आहे. या वेळी झी स्टूडियोजच्या सहयोगाने, त्यांचे प्रोडक्शन ‘सनक – होप अंडर सीज’ या धमाकेदार एक्शनपटासोबत सज्ज झाले आहेत. विद्युत चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असून आपल्या करिअरमध्ये यशस्वी निर्माता विपुल शाह यांच्यासोबत हा 5वा चित्रपट आहे.

विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनीत, ‘सनक – होप अंडर सीज’ झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत आहे. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.