झी 5 च्या आगामी ‘कागझ’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याला अनेक चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. या चित्रपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत असून या आठवड्यात हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

Pankaj tripathi and Satish kaushik in Kaagaz
Pankaj Tripathi and Satish Kaushik in Kaagaz

चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी सलमान खानने या चित्रपटासाठी एक कविता वाचली असल्याची माहिती या चित्रपटाविषयी बोलताना दिली. कौशिक म्हणाले की, “तरुण कवी अझीम अहमद अब्बासी यांनी लिहिलेल्या कवितेला आम्ही चित्रपटात वापरले आहे. या संपूर्ण चित्रपटाचा आशय या कवितेत एकवटला असून आपल्या खास अंदाजात सलमान खान याने ती वाचली आहे.” चित्रपटात सुरूवातीला आणि शेवटी येणाऱ्या या कवितेला सलमान खान याच्या आवाजाने एक वेगळीच उंची प्राप्त झाल्याचे कौशिक म्हणाले.

Satish Kaushik in Kaagaz
Satish Kaushik in Kaagaz

‘कागझ’ सलमान खान फिल्म्स आणि सतीश कौशिक प्रोडक्शन्स यांची निर्मिती असून दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, मोनल गज्जर आणि अमर उपाध्याय यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

हा चित्रपट 7 जानेवारी 2021 रोजी जी 5 वर प्रदर्शित होईल.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.