नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म तर्फे, “नेटफ्लिक्स स्ट्रीमफेस्ट”चे आयोजन येत्या ५ व ६ डिसेंबर २०२० रोजी म्हणजेच येत्या शनिवार व रविवार रोजी करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नेटफ्लिक्स या दोन दिवसांसाठी भारतात मोफत असेल. याचा अर्थ असा की ज्यांनी या ओटीटी प्लॅटफॉर्मची सदस्यता घेतलेली नाही, त्यांना सुद्धा यावरील वेब सीरिज, चित्रपट आणि त्यावरील इतर शोज पाहता येतील. 

नेटफ्लिक्स विनामूल्य कसे पहावे?  (how to watch free Netflix during Netflix StreamFest)  

1. प्रथम Netflix.com/StreamFest या अधिकृत वेबसाइटवर जा.
2. आपण नेटफ्लिक्स मोबाइल ऍप देखील डाउनलोड करू शकता.
3. आपल्याकडे आधीपासूनच नेटफ्लिक्सवर खाते नसेल तर आपल्याला साइन अप करावे लागेल.
4. यासाठी आपण  Netflix.com/StreamFest जाऊन एक रिमाइंडर सेट करू शकता.
5. नेटफ्लिक्स स्मार्टफोन, टीव्ही, आयओएस डिव्हाइस, गेमिंग कन्सोल इ. वर मोफत वापरता येते. 
6. स्ट्रीमफेस्ट अंतर्गत नेटफ्लिक्स सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य आहे, म्हणजे कोणतेही क्रेडिट-डेबिट कार्ड किंवा पेमेंटची आवश्यकता नाही.
7. नेटफ्लिक्स स्ट्रीमफेस्ट दरम्यान आपण उघडलेले अकाउंट फक्त एकच व्यक्ती वापरू शकते.

नेटफ्लिक्स इंडियाने म्हटले आहे की, “नेटफ्लिक्सच्या माध्यमातून आम्हाला जगातील अतिशय अनोख्या कथा भारतातील रसिकांपर्यंत आणायच्या आहेत, म्हणून आम्ही स्ट्रीमफेस्ट आयोजित करीत आहोत. नेटफ्लिक्स ५ डिसेंबर रात्री १२ वाजल्यापासून ते ६ डिसेंबर रात्री १२ वाजेपर्यंत मोफत असणार आहे.”

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.