३० एप्रिलपासून हसवून-हसवून लोटपोट करण्यासस सज्ज; अनोख्‍या अनस्क्रिप्‍टेड कॉमेडी-रिऍलिटी शोचे सर्व ६ एपिसोड्स २४० देश व प्रदेशांमध्‍ये अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येतील.

 

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज नवीन अमेझॉन ओरिजिनल सिरीज ‘एलओएल – हसे तो फसे‘ च्‍या ऑफिशियल ट्रेलरचे अनावरण केले. (Amazon Prime Video, today, unveiled the official trailer of the all-new Amazon Original Series LOL– Hasse Toh Phasse) आंतरराष्‍ट्रीय अमेझॉन ओरिजिनल सिरीज एलओएलची ही स्‍थानिक रूपांतरण असलेली आवृत्ती भारताच्‍या विनोदी क्षेत्रामध्‍ये स्‍वत:ची अविश्‍वसनीय छाप पाडलेल्‍या कॉमेडीयन्‍सच्‍या प्रख्‍यात समूहाला एकत्र आणेल जसे आदर मलिक, आकाश गुप्‍ता, अदिती मित्तल, अंकिता श्रीवास्‍तव, सायरस ब्रोचा, गौरव गेरा, कुशा कपिला, मल्लिका दुआ, सुनिल ग्रोव्‍हर आणि सुरेश मेनन. होस्‍ट्स अर्शद वारसी व बोमन इराणी यांच्‍या प्रखर परीक्षणांतर्गत हे कॉमेडीयन्‍स सर्वात अवघड चॅलेंजचा सामना करतील.

कदाचित पहिल्‍यांदाच त्‍यांच्‍या विनोदी कौशल्‍यासोबत त्‍यांच्‍या सहनशक्‍तीचे देखील परीक्षण होणार आहे, जेथे ते स्‍वत:चा पोकर चेहरा राखत घरातील इतरांना हसवण्‍यासाठी सलग सहा तास स्‍पर्धा करतील. खोलीतील शेवटची व्‍यक्‍ती देखील हसत ठेवण्‍याचे ध्‍येय आहे आणि दीर्घकाळापर्यंत चेहरा सरळ ठेवणारी व्‍यक्‍ती शेवटी गेम जिंकेल. भारतातील आणि २४० देश व प्रदेशांमधील प्राइम सदस्‍य ३० एप्रिल २०२१ पासून फक्‍त अमेझॉन प्राइम व्हिडिओवर शोचा पाहण्‍याचा मनमुराद आनंद घेऊ शकतात.

एलओएल – हसे तो फसे-ट्रेलर: (LOL– Hasse Toh Phasse Trailer)

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.