आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

या गोष्टीला कोणीच नाकारू शकणार नाही की तापसी पन्नू एक प्रतिभाशाली अभिनेत्री आहे आणि आपली निर्मिती संस्था ‘आउटसाइडर फिल्म्स, अंतर्गत आगामी चित्रपट ‘ब्लर’ दर्शकांना आणखी एक रोमांचक अनुभव देण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्याचे निर्मात्यांतर्फे कळविण्यात आले आहे. (Shooting wrap for psychological thriller film Blurr starring Taapsee Pannu)

अजय बहल दिग्दर्शित आणि तापसी आणि गुलशन देवाय्या अभिनीत, पवन सोनी आणि अजय बहल यांनी लिहिलेला ब्लर हा मानसशास्त्रीय थरारक चित्रपट एका अपरिहार्य परिस्थितीत अडकलेल्या मुलीच्या कथेद्वारे आणि त्यानंतर येणारा थरार आणि नाट्यासोबत प्रेक्षकांना येऊन भीडतो. 

सुंदर नैनीतालमध्ये मोठ्या प्रमाणावर चित्रीत करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या टीमच्या आनंदाला पारावार उरलेला नाही कारण त्यांनी नुकत्याच छोट्या शहरात ‘ब्लर’चे आव्हानात्मक वेळापत्रक पूर्ण केले आहे.

नैनीतालमध्ये आपल्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी बोलताना दिग्दर्शक अजय बहल म्हणतात, “नैनीताल लेक, मॉल रोड आणि इतर पर्यटन स्थळांसारख्या वास्तविक ठिकाणी शूटिंग करणे विशेषतः गर्दीमुळे कठीण होऊ शकते. आम्ही रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत चित्रीकरण करायचो. पण आमच्या सर्वांसाठी हा एक पूर्णपणे समाधानकारक अनुभव होता. नैनीतालने चित्रपटात सौंदर्य आणि गूढ तितकेच जोडले आहे. “

पवन सोनी आणि अजय बहल यांनी लिहिलेले, झी स्टुडिओज, तापसी पन्नूचे आउटसाइडर फिल्म्स आणि एचेलॉन प्रॉडक्शन्सचा ‘ब्लर’, हा एक मनोवैज्ञानिक थ्रिलरपट आहे जो तुमच्या अंगावर शहारे आणेल. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.