अमेझॉन प्राईम व्हिडिओने त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘द फॅमिली मॅन 2’ चा नवा प्रोमो सादर केला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज बाजपेयी उर्फ ​​श्रीकांत तिवारी डेस्क जॉबवर ‘मिनिमम मॅन’च्या रूपात दिसत आहे, जो पहिल्या सीजनमधील त्याच्या लुकहून वेगळा आहे. (AMAZON PRIME VIDEO UNVIELS NEW HILARIOUS PROMO FROM ‘THE FAMILY MAN SEASON 2’)

इथे पहा: 

अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या ‘द फॅमिली मॅन 2’ च्या चर्चांना उधाण आले आहे. जेव्हापासून अमेझॉन प्राईम व्हिडिओवर याची सुरुवात झाली होती, तेव्हापासून ‘द फॅमिली मॅन’चा आगामी भाग, प्रेक्षकांच्या जवळपास दोन वर्षांहून अधिक काळ प्रतीक्षित सीरीजमधील एक राहिला आहे.

सीक्वलच्या घोषणेनंतर, प्रेक्षक सीजन 2 मध्ये काय होणार याचे तर्क लावत होते आणि आता, द फॅमिली मॅन 2 च्या ट्रेलरच्या अनवरणानंतर तर, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

राज आणि डीके द्वारे रचित पुरस्कार विजेत्या या अमेझॉन ओरिजिनल सीरीजसोबत दक्षिण सुपरस्टार समंथा अक्किनेनी आपला डिजिटल डेब्यू करत असून, पद्मश्री पुरस्कार विजेता अभिनेता मनोज बाजपेयी, प्रियामणि यांच्या टीममध्ये सहभागी होणार आहे. यासोबतच शारिब हाशमी, सीमा बिस्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धनवंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकुरसारखे प्रतिभावान कलाकार दिसणार आहेत. या मध्ये तामिळ सिनेमातील माइम गोपी, रवींद्र विजय, देवदर्शिनी चेतन, आनंदसामी आणि एन. अलगमपेरुमल यांच्यासारखे दिग्गज कलाकार असणार आहेत.

डी2आर फिल्म्स द्वारे निर्मित, हा बहुप्रतीक्षित शो 4 जून 2021 मध्ये 240 हून अधिक देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये अमेझॉन प्राईम व्हिडिओवर विशेष रूपाने प्रदर्शित होणार आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.