कुली नं १ चे ट्रेलर आऊट. बघा इथे!

येत्या ख्रिसमस म्हणजे २५ डिसेंबर रोजी ‘अमेझॉन प्राईम व्हिडीओ’ वर प्रदर्शित होणाऱ्या ‘कुली नं १’ या आगामी चित्रपटाचे ट्रेलर आज रिलीज करण्यात आले. चित्रपटाचा नायक अभिनेता वरुण धवन व सिनेमा संबंधित इतर टीम मेम्बर्सने स्वतःच्या ट्विटर हॅण्डलवरून हे ट्रेलर रिलीज केले आहे. सिनेमाचे ट्रेलर उत्कंठावर्धक असून नायक वरुण धवनने ऍक्शन, डान्स, कॉमेडी, इमोशन्स या सर्व बाबतीत छान काम केल्याचे दिसत आहे. वरुणला सारा अलीनेही छान साथ दिल्याचे दिसते. ट्रेलर लॉन्च च्या मुहूर्तावर वरुण, सारा, परेश रावल, दिग्दर्शक डेव्हिड धवन, निर्माता वाशू भगनानी यांनी रसिकांशी संवाद साधला. 

 

वरुण चे वडील, प्रख्यात निर्माता दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचे दिग्दर्शन लाभलेला हा ४५ वा चित्रपट असणार आहे. ९० च्या दशकात गोविंदा च्या प्रमुख भूमिकेत सुपरहिट ठरलेला ‘कुली नं १’ चित्रपटाचाच हा रिमेक आहे. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या गोविंदा-करिष्मा कपूर च्या कुली नं १ ला या वर्षी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. कादर खान यांनी साकारलेली नायिकेच्या वडिलांची भूमिका यावेळी परेश रावल यांनी केली आहे. प्रख्यात निर्माते वाशू भगनानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून वरुण सोबत नायिकेच्या भूमिकेत सारा अली खान दिसणार आहे. परेश रावल, जावेद जाफरी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहेत. आधी ठरल्याप्रमाणे कुली नं १ हा  १ मे २०२० रोजी प्रदर्शित होणार होता परंतु कोरोना लॉक-डाऊन मुळे ते लांबले. आता सिनेमागृहात प्रदर्शन न होता थेट अमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा प्रदर्शित होणार आहे. 

 

 

पहा ट्रेलर इथे –

 

 

 

 

Website | + posts

Leave a comment