अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाचा वाद आता मिटला असून मेघराज राजेभोसले यांच्या नावावर पुन्हा एकदा संचालक मंडळाने विश्वास व्यक्त केला आहे. यापुढेही अध्यक्ष म्हणून मेघराज राजेभोसलेच काम पहाणार आहेत.
२६ नोव्हेंबरला कोल्हापूर येथे झालेल्या महामंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. ज्यात तेरा संचालकांपैकी आठ संचालकांनी राजेभोसले यांच्या राजीनाम्याची मागणी करीत अविश्वास व्यक्त केला होता. त्यावेळी प्रभारी अध्यक्ष म्हणून विद्यमान उपाध्यक्ष धनाजी यमकर यांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी लवकरच पुढील बैठक घेऊन नवीन अध्यक्ष निवडले जातील असे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी सांगितले होते. मात्र बुधवार (९ डिसेंबर २०२०) रोजी मुंबई येथे संपन्न झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सुशांत शेलार व निकिता मोघे यांनी मेघराज राजेभोसले यांना पाठिंबा दिल्यामुळे अविश्वास ठराव नामंजूर झाला.
यावेळी मा. मेघराज राजेभोसले (अध्यक्ष), मा.धनाजी यमकर (उपाध्यक्ष), मा. विजय खोचीकर (उपाध्यक्ष), मा. सुशांत शेलार (प्रमुख कार्यवाह), मा.चैत्राली डोंगरे (सह कार्यवाह), मा.निकिता मोघे (सह कार्यवाह), मा. संजय ठुबे (खजिनदार), मा. शरद चव्हाण (सह खजिनदार), मा. पितांबर काळे (संचालक), मा. सतीश रणदिवे (संचालक), मा.सतीश बिडकर (संचालक), मा.वर्षा उसगांवकर (संचालिका), मा. रणजित तथा बाळा जाधव (संचालक), मा.रवींद्र गावडे (स्वीकृत संचालक), मा. रत्नकांत जगताप (स्वीकृत संचालक) उपस्थित होते.
(Press Release)