आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम

————————

पूजा एंटरटेनमेंटचा अक्षय कुमार अभिनीत बहुप्रतीक्षित हेरगिरी थ्रिलर सिनेमा ‘बेलबॉटम’चा ट्रेलर (Bellbottom Trailer) आज प्रदर्शित झाला. अत्यंत उत्कंठावर्धक असलेल्या या ट्रेलर्सला रसिकांनी कौतुकाची थाप दिली आहे. (The trailer of the Akshay Kumar film ‘Bellbottom’ released) 

१९ ऑगस्ट रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणारा अक्षय कुमार स्टारर हा चित्रपट २ डी आणि ३ डी स्वरूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या थिएटर रिलीजच्या बातमीने इंडस्ट्री तसेच प्रेक्षकांमध्ये उत्साह असून, अत्यंत उत्कंठावर्धक ट्रेलरने त्यात भर घातली आहे. 

टीम बेलबॉटमने आज दिल्लीच्या पीव्हीआर प्रिया या सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये बेलबॉटम चे  ट्रेलर लाँच केले. मोठ्या पडद्यावरील मनोरंजनाचे स्वागत करण्यासाठी हा एक अत्यंत प्रतिकात्मक आणि नॉस्टॅल्जिक क्षण होता. बेलबॉटम चे ट्रेलर जागतिक स्तरावरील अॅक्शन, रेट्रो स्वॅग, फूट-टॅपिंग बॅकग्राउंड स्कोअर, उच्च निर्मिती मूल्ये आणि अक्षयकुमारच्या अॅक्शन व्यक्तिमत्त्वाने परिपूर्ण अशा चित्रपटाचे  आश्वासन देतो.

या चित्रपटात अक्षय कुमार समवेत वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांच्याही भूमिका आहेत आणि रणजीत एम तिवारी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

चित्रपटाची निर्मिती पूजा एंटरटेनमेंट बॅनरखाली  वाशु भगनानी, जॅकी भगनानी यांनी तर सोबतीला  दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी आणि निखिल अडवाणी यांनी केली आहे.

१९ ऑगस्ट, २०२१ रोजी ‘बेलबॉटम’ तुमच्या जवळच्या  सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

पहा ट्रेलर- 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.