चित्रपट निर्माते रितेश सिधवानी यांनी प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य आणि समाजातील वंचित वर्गाच्या लसीकरणासाठी घेतला पुढाकार; लसीकरणासाठी भक्तिवेंदाता हॉस्पिटलसोबत करार (Film Producer Ritesh Sidhwani took Initiative for Covid-19 Vaccination Drive)

चित्रपट निर्माते रितेश सिधवानी चित्रपट उद्योगातील लोकांच्या लसीकरणाची प्रयत्नशील असून त्यांनी प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सर्व सदस्य, त्यांचा स्टाफ, त्यांचे शेजारी आणि समाजातील वंचित वर्गाच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. रितेश यांनी उद्योग आणि समाजाला मदत करण्याचे आपले उद्दिष्ट्य पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने मीरा रोड स्थित भक्तिवेंदाता हॉस्पिटलसोबत करार केला आहे. सोबतच, त्यांनी मे महिन्यात वॅक्सिनचे 15 हजार डोस उपलब्ध करून देण्यासाठी देखील मदत केली आहे.

इतकेच नव्हे तर, रितेश अतिरिक्त आर्थिक मदतीसाठी देखील आपले योगदान देत आहेत जेणेकरून ग्रामीण भागांमधील लोकांसाठी मोफत लसीकरण उपलब्ध करता येऊ शकेल.

भक्तिवेदांतला सीरमच्या यादीत समाविष्ट देखील करण्यात आले नव्हते मात्र, रितेश यांनी योग्य संधी येताच सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घेतली.

  • जादू ९० च्या दशकाची... साल १९९०
  • Attack | Official Trailer
  • जन्मदिन विशेष-सी रामचंद्र-अण्णांचा धमाका!
  • अनपॉज्ड
  • स्मृतिदिन विशेष .. सिनेसृष्टीतील सुवर्णपर्ण पद्मश्री श्रीदेवी...
Website | + posts

Leave a comment