आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

The first Marathi movie to be shot on a smart phonePondicherry’  on 25th February 2022 at your nearest cinema. ‘गुलाबजाम’ सारख्या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे सचिन कुंडलकर ‘पाँडीचेरी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटात सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पाँडीचेरी सारख्या सुंदर निसर्गरम्य शहरात घडणारी मराठी माणसाची गोष्ट आहे. नवीन पिढीच्या नात्याचे प्रतिनिधित्व करणारा हा सिनेमा असून विस्थापित झालेले लोक कोणत्या पध्दतीची नाती निर्माण करतात, यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.  यात सई, वैभव आणि अमृता यांच्या नात्याचा नवीन प्रवास आपल्यासमोर उलगडणार आहे. या चित्रपटाचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा भारतातील पहिला चित्रपट आहे, जो संपूर्ण स्मार्ट फोनवर चित्रित करण्यात आला आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी आणि क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत या चित्रपटासाठी सचिन कुंडलकर यांनी तिहेरी भूमिका साकारली आहे, दिग्दर्शनासोबतच त्यांनी लेखनाची आणि निर्मात्याची धुराही सांभाळली आहे. याव्यतिरिक्त नील पटेलही या चित्रपटाचे निर्माता आहेत. मोह माया फिल्म्स आणि इंक टॅंक निर्मित हा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘पाँडीचेरी’बद्दल ‘प्लॅनेट मराठी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘’प्लॅनेट मराठी जगातील पहिले मराठी ओटीटी असून त्यावर पहिली थिएटर फिल्म ‘जून’ झळकली होती. आम्ही नेहमीच नवनवीन प्रयोग करण्याच्या प्रयत्नात असतो. असाच वेगळा प्रयोग ‘पाँडीचेरी’मध्येही करण्यात आला आहे. जी स्मार्ट फोनवर चित्रीत करून प्रदर्शित होणार आहे. अशा पध्दतीची ही पहिली फिचर फिल्म आहे. अत्यंत मोजक्या टीममध्ये केवळ एक महिन्यात एका उत्तम चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण ‘पाँडीचेरी’ आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि याचा अनुभव आपल्या कुटुंबासह चित्रपटगृहातच घ्यावा.”

दिग्दर्शक सचिन कुंडलकर चित्रपटाबद्दल सांगतात, ”हा एक वेगळा विषय आहे. टिझरवरून हा चित्रपट लव्ह ट्रायंगल वाटत असला तरी चित्रपटाचा हा विषय अजिबात नाही. हा एक भावनिक प्रवास असून या तिघांच्या नात्याचा शेवट कुठे होतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा संपूर्ण चित्रपट मोबाईलवर चित्रित करण्यात आल्याने साहजिकच यात भरपूर मोठा तांत्रिक फरक आहे. कुठेही त्याचा समतोल बिघडू नये, यासाठी काळजीपूर्वक चित्रीकरण करण्यात आले आहे. यात छायाचित्रणकार मिलिंद जोग यांचेही कसब दिसते. या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक अष्टपैलू कलाकार एकत्र आले आहेत. ही अनोखी भावनिक कथा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल.” 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

2 Comments

  • Charudatta sawant
    On February 19, 2022 8:28 pm 0Likes

    हा खरे तर चांगला प्रयोग आहे, ह्यामुळे भविष्यात कमी खर्चात छान कलाकृती पाहावयास मिळू शकतील.
    परंतु हा चित्रपट ‘स्मार्टफोन’ वर चित्रित झालेला पहिला चित्रपट नाही आहे.
    वर्ष २०२० मध्ये निर्मिती झालेला ‘पिच्चर’ ह्या चित्रपटास हा मान जातो.
    या विषयीची माहिती मी माझ्या ब्लॉगवर दि. २३/०५/२०२१ रोजी लेखाद्वारे प्रसिद्ध केली आहे. रसिकांनी हा लेख नक्की वाचावा. आणि आपला अभिप्राय द्यावा. यात MX Player वर आपणास ‘पिच्चर’ निशुल्क पाहावयास मिळेल.

    ‘वाई जवळच्या एका छोट्या गावातील तरुणाने चक्क ‘आयफोन’ वापरून पूर्ण लांबीचा मराठी चित्रपट तयार केला आणि आपला पहिलावाहिला चित्रपट MX-PLAYER ह्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यापर्यंत झेप घेतली. चित्रपट पाहताना अजिबात वाटत नाही की खरंच हा चित्रपट ‘आयफोन’वर चित्रित केलेला आहे ….’

    लेखाची लिंक: https://wp.me/pct0rI-1fF

  • 20bet
    On September 5, 2023 1:13 am 0Likes

    Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.

Leave a comment