‘चंदीगड में’ आणि ‘बुर्ज खलिफा’ या दोन बॅक टू बॅक हिट पार्टी गाण्यांमध्ये चमकल्यानंतर आता कियारा अडवाणी चे “हिलें टूट गयी” हे ‘इंदू की जवानी’ या आगामी चित्रपटातील गीत रसिक श्रोत्यांना व खासकरून तरुणाईस जाम आवडत असल्याचे दिसत आहे. 

 

 

 

आदित्य सील आणि गुरु रंधावा यांच्यासहित असलेल्या या गाण्याच्या टीझरने आधीच उत्सुकता वाढवली होती. आता हे गाणे म्हणजे हिट लग्नगीतांच्या यादीत जाऊन बसणार असे दिसत आहे. हा पेपी ट्रॅक बादशाह आणि आस्था गिल यांनी गायला आहे. कियारा अडवाणी ची प्रमुख भूमिका असलेला इंदू की जवानी ११ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे. हा अन-लॉक नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा दुसरा चित्रपट आहे.

 

कियारा अडवाणी शिवाय ‘इंदू की जवानी’मध्ये आदित्य सील आणि मल्लिका दुआ यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अबीर सेनगुप्ता दिग्दर्शक असून मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, निकिल अडवाणी, भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, निरंजन अय्यंगार आणि रायन स्टीफन यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

पहा ‘हिलें टूट गयी’ सॉंग- 

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.