आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Oscar 2023. History Created. RRR’s Naatu Naatu wins the Oscar for Best Song.

RRR चित्रपटामधील गाणे “नाटू नातू” ने 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी ऑस्कर जिंकला आहे. एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केलेले, चंद्रबोसचे हे गीत आणि राहुल सिपलीगुंज आणि काला भैरव यांच्या गायनाने, मार्च 2022 मध्ये रिलीज झाल्यानंतर लगेचच प्रचंड लोकप्रिय झाले होते. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर, ते  जागतिक स्तरावर पोहोचले आणि तेव्हापासून हे गाणे अधिकच लोकप्रिय झाले. त्याला परदेशी प्रेक्षकांचेही खूप प्रेम मिळाले. आपल्या स्वीकृती भाषणात, कीरावानी यांनी राजामौली आणि संपूर्ण भारत देशाच्या सन्मानार्थ स्व-रचित गाणे गायले.

या वर्षाच्या सुरुवातीला नातू नातूने गोल्डन ग्लोबमध्ये याच प्रकारात बाजी मारली होती. याने क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड्स आणि हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशनमध्ये सर्वोत्कृष्ट गाणे देखील जिंकले. या गाण्याची स्पर्धा  ऍपलौज टेल इट लाइक अ वुमन (डियान वॉरेन), होल्ड माय हॅन्ड टॉप गन मॅव्हरिक (लेडी गागा आणि ब्लडपॉप), लिफ्ट मी अप ब्लॅक पँथर वाकांडा फॉरएव्हर (टेम्स, रिहाना, रायन कूगलर आणि लुडविग गोरानसन) आणि  दिस इज ए लाइफ एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स (रायन लॉट, डेव्हिड बायर्न आणि मित्स्की) या गाण्यांशी होती.

हे गाणे ऑस्करच्या मंचावर राहुल सिपलीगुंज आणि काला भैरव यांनी सादर केले होते. दीपिका पदुकोणने या परफॉर्मन्सची ओळख करून दिली, ज्याला समारंभात स्टँडिंग ओव्हेशन मिळाले.

तुम्ही ते येथे पाहू शकता:  

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.