गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटाच्या काळात लाखो लोकांसाठी देवासारखा धावून आलेला लोकप्रिय अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) यालाच आता कोरोनाने गाठले आहे. त्याची कोरोना टेस्ट पॉजिटीव्ह (Corona Positive) आल्याची बातमी त्याने स्वतःच ट्विटरवरून दिली आहे. त्याच्या या ट्विट वर अभिनेत्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला असून सर्वांनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. 

सोनू सूदने ही पॉझिटिव्ह आल्याची बातमी शेअर करतांना म्हटले आहे की, ” मी स्वतः विलगीकरणात असून आता माझ्यासाठी तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी  आधीपेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा कोणत्याही अडचणीत मी तुमच्या सोबत आहे.”

सोनू सूदने कोरोना काळात गेल्या वर्षभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. सामान्य माणसासाठी सोनू सूद हे नाव आता एखाद्या देवासारखे झाले आहे. त्यामुळे सर्वजण त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करीत आहेत. 

sonu sood helpline

 

कालच्याच ट्विट मध्ये सोन सूद याने हॉस्पिटल्स मध्ये खूप प्रयत्न करूनही बेड्स मिळत नसल्याबद्दल खेद व्यक्त करीत स्वतःला हेल्पलेस असल्याची भावना बोलून दाखवली होती, शिवाय सर्वांना मास्क घालण्याचे व स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. 

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.