आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

‘राधेश्याम’च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या आधी जाहीर केलेल्या तारखेवरच चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. (‘Radheshyam’ to be released on January 14, 2022!) प्रभास-पूजा अभिनीत हा चित्रपट 14 जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता, जो दक्षिणेत एक मोठा वीकेंड आहे कारण त्यादिवशी पोंगल असणार आहे. 

वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेगवेगळ्या पोस्टर्समुळे चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. ‘लवर बॉय’ अवतारातील प्रभासची झलक दर्शकांच्या पसंतीस उतरत असून रोमांटिक शहर इटलीच्या सुंदर बॅकड्रॉपने हा उत्साह द्विगुणित केला आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये एक विंटेज, ओल्ड स्कूल आणि ड्रीमी वाइब्सचा समावेश असून चित्रपटातील प्रभास आणि पूजा हेगडे यांची केमिस्ट्री चर्चेचा विषय बनली आहे.

‘राधेश्याम’ एक नितांत सुंदर प्रेम कहाणी आहे जी पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पॅन इंडिया सुपरस्टार प्रभास आणि सुंदर पूजा हेगडे अभिनीत हा बहुभाषी चित्रपट, राधा कृष्ण कुमार यांच्याद्वारे दिग्दर्शित असून गुलशन कुमार आणि टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत करण्यात आली आहे. हा चित्रपट यूवी क्रिएशंसची निर्मिती आहे. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment