एमजीएम युनिवर्सिटी स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स (MGM University School of Film Arts) सातत्याने सिनेमा क्षेत्राशी निगडित माहिती नवोदितांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत असते. माहितीच्या या मालिकेचा एक भाग म्हणून २६ जून २०२१ ला संध्याकाळी  ५ वाजता सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक मकरंद अनासपुरे यांचे ऑनलाईन व्याख्यान ठेवण्यात आले आहे. (Online Guidance Webinar by Actor Makrand Anaspure)

फिल्म इंडस्ट्री मध्ये करीत करण्याची भुरळ पडणं आता कॉमन होत चाललंय. सिनेमा, टीव्ही, वेबसिरीज यांच्या माध्यमातून नव्याने उपलब्ध होत असलेल्या संधी हे सुध्दा त्याचे एक कारण आहे. दुर्दैवाने यशस्वी होण्याचे प्रमाण मात्र फार कमी आहे. या अपयशाचे कारण बऱ्याचवेळा आपले या क्षेत्रा विषयी असलेले अज्ञान किमवा गैरसमज या मध्ये दडलेले आढळते. माहितीच्या या मालिकेचा एक भाग म्हणून मकरंद अनासपुरे यांचे ऑनलाईन व्याख्यान ठेवण्यात आले आहे. 

https://mgmfilmarts.com/ या संकेत स्थळावर नोंदणी करणाऱ्या निवडक तरुणांना व्याख्याना बरोबर मकरंद अनासपुरे यांच्या बरोबर चर्चा सुध्दा करता येणार आहे. या संधीचा सिनेमा क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या जास्तीत जास्त तरुणांनी फायदा घ्यावा असे आवाहन डॉ. रेखा शेळके, डीन, एमजीएम युनिवर्सिटी यांनी केले आहे. 

हेही वाचा – अभिनयाचं चालतं बोलतं, समृद्ध विद्यापीठ .. सदाशिव अमरापूरकर

 

Website | + posts

Leave a comment