आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

बहुआयामी लेखक-चित्रपट निर्माता अश्विनी अय्यर तिवारीने चँपियन्स महेश भूपति आणि लिएंडर पेस यांच्यावरील आपला माहितीपट नुकताच पूर्ण केला आहे. या माहितीपटाचे लेखन-दिग्दर्शन स्वत: अश्विनीने केले आहे. (Ashwiny Iyer Tiwari concludes the journey for docu-drama based on Mahesh Bhupathi and Leander Paes) 

महेश भूपति-लिएंडर पेस या जोडगोळीवर आधारित माहितीपटावर काम करताना अश्विनी अय्यर तिवारीची या दोन चँपियन्ससोबत आयुष्यभारासाठी मैत्री झाली असून हे आमच्यातील सुंदर सहयोगाचे प्रतीक असल्याचे अश्विनीने म्हटले आहे.

या माहितीपटावर जवळपास दीड वर्ष सुरु असलेले काम पूर्ण झाल्याचे जाहीर करताना तिने आपल्या सोशल मीडियावर शेअर लिहिले, “@mbhupathi आणि @leanderpaes यांच्या सोबतचा दीड वर्षांचा प्रवास पूर्ण झाला असून इथून पुढे आयुष्यभराच्या मैत्रीची नवी यात्रा सुरु झाली आहे. @ niteshtiwari22 आणि मी पहिल्यांदा सह-दिग्दर्शन करत आहोत. माहितीपटासाठी दोन अतिशय प्रतिभावान चँपियन्सची माहिती संकलित करणे आणि लिहिणे हे देखील नितेश, पीयूष आणि माझ्यासाठी पहिल्याच अनुभव होता. आम्ही खूप आभारी आहोत आमचे स्टूडियो पार्टनर्स @zee5, ज्यांच्यासोबत या महामारीच्या कठिण काळात देखील जगभर मोठ्या प्रमाणात याची निर्मित करण्यात आम्ही यशस्वी झालो. आमच्या कार्याचा कणा असलेले @varun.shetty.1840 @kavanahalpara @raiajayg आणि @earthskynotes यांच्यासोबतच माझी शानदार प्रोडक्शन, डायरेक्शन, एकाउंट्स टीम आणि बिमल पारेख यांना खूप खूप धन्यवाद आणि या वेब सीरीजच्या पैकेजिंगसाठी कलेक्टिव आर्टिस्ट नेटवर्क आणि प्रत्येक स्पोर्ट्स पार्टनर, स्पोर्ट्स पर्सन, लाइन प्रोड्यूसर यांना धन्यवाद! ज्यांच्यामुळे #Breakpoint ला आकार मिळाला. आशा आहे कि तुम्ही @Zee5 वर लवकरच या सीरीजचा तेवढाच आनंद घेऊ शकाल जितका आम्हाला भारतीय टेनिसच्या विश्व चँपियन्सना ऐकताना आणि त्यांच्याशी बोलताना आला, जे भारतीय खेळातील येणाऱ्या काळाची आकांक्षा आणि प्रेरणा आहेत.”

या माहितीपटाचे नाव ‘ब्रेकपॉइंट’ असून त्याचा प्रीमियर ZEE5 वर होणार आहे. अश्विनीने या आधी ‘नील बट्टे सन्नाटा’ आणि ‘बरेली की बर्फी’ सारख्या प्रकल्पांसोबत चित्रपट निर्माता म्हणून केलेल्या कार्याला समीक्षकांनी गौरवलेले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या तिच्या ‘मॅपिंग लव्ह’ या पुस्तकाला देखील सामान्य लोकांचा आणि बॉलीवूडमधील तारे-तारकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

तसेच, सोनी लिववरील ‘फाडू’ या वेब सीरिजद्वारे निर्माती ओटीटीच्या जगात पदार्पण करण्यास सज्ज आहे. तसेच, सध्या श्री नारायण मूर्ती आणि श्रीमती सुधा मूर्ती यांच्या जीवनचरित्रावर काम करत असून हा तिच्या आवडत्या प्रकल्पांपैकी एक आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा  

Website | + posts

Leave a comment