आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

अमेझॉन मिनी टीवीची पहली मल्टी-स्टारर कथामालिका, काली पीली टेल्सच्या ट्रेलरचे अनावरण. (Amazon Mini TV Launched Trailer of Kaali Peeli Tales)

अमेझॉनची मोफत व्हिडीओ मनोरंजन सेवा– मिनी टीवीने एका आकर्षक ट्रेलरच्या अनावरणासोबत आपली पहिली कथामालिका, काली पीली टेल्सच्या एक्सक्लूसिव प्रीमियरची घोषणा केली असून 20 ऑगस्ट, 2021 ला प्रदर्शित होणार आहे. मैडमिडास फिल्म्सचे अदीब रईस यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या आणि दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या ‘काली पीली टेल्स’ मध्ये मुंबई शहराच्या पार्श्वभूमीवर सहा छोट्या छोट्या कथांचा अतिशय मनोरंजक कथापट मांडण्यात येणार आहे.

Amazon Mini TV Launched Trailer of Kaali Peeli Tales

‘काली पीली टेल्स’मधून मुंबई शहरातील प्रेम, नातेसंबंध आणि जीवनाच्या जटिलतेला उत्तम प्रकारे दर्शवण्यात आले आहे. यातील सहा अनोख्या कहाण्यांचे कथानक परिवर्तन आणि स्वीकृतिच्या सीमारेषेवर उभे असणाऱ्या तरुणांच्या आणि इथल्या शहरी व्यक्तिरेखांच्या आस पास फिरणारे आहे, यामध्ये विनय पाठक, गौहर खान, सयानी गुप्ता, मानवी गगरू, सोनी राजदान, हुसैन दलाल, शारिब हाशमी, प्रियांक्षी पेन्युली, तन्मय धनानिया, सादिया सिद्दीकी आणि अदीब रईस यांसारखे दिग्गज कलाकार असणार आहेत.

ट्रेलर लिंक:

या कथामालिकेतील प्रत्येक कथापट प्रणय, विवाह, धोका, समलैंगिकता, माफी आणि घटस्फोट या विषयांवर केंद्रित असून महानगरीय जीवनातील आणि सध्याच्या डिजिटल युगातील अनिश्चिततेला लक्षात घेऊन, आपापसातील नातेसंबंधांना पूर्णपणे नव्या दृष्टिकोनातून सादर करते. काली पीली टॅक्सी ही मुंबईची ओळख आहे आणि कथामालिकेतील कथांना जोडणारा दुआदेखील आहे. सिंगल झुमका, लव्ह इन ताडोबा, मॅरेज 2.0, फिश फ्राय और कॉफी, हरा भरा आणि लूज एंड्स ही या कथांची शीर्षके आहेत.

मिनीटीव्हीच्या लायब्ररीत दाखल झालेल्या या नवीन कथांबद्दल बोलताना, अमेझॉन मिनीटीव्ही आणि प्राइम व्हिडिओ इंडियाचे संचालक आणि प्रमुख श्री विजय सुब्रमण्यम म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या उत्पादनांची उपलब्धता करण्यासाठी नेहमीच उत्सुक असतो. तसेच, अमेझॉन मिनीटीव्हीवर, उत्तम कंटेंट प्रदान करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. अत्यंत प्रतिभावान अभिनेत्यांनी यात अभिनय केला असून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या 6 लघुकथा आम्ही घेऊन येत आहोत. आणि आम्हाला खात्री आहे की आमचे अमेझॉन ग्राहक मिनीटीव्हीवर उपलब्ध असलेल्या या व्हिज्युअल ट्रीटचा मनापासून आनंद घेतील.”

काली पीली टेल्सचे दिग्दर्शक अदीब रईस म्हणाले कि, “या कथासंग्रहातील सर्व सहा कथा प्रेमाच्या आणि नात्यांच्या वेगवेगळ्या छटा दाखवतात. नवीन प्रेमापासून ते विवाहित जीवनाला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत, प्रेमातील धोका इथपासून घटस्फोटापर्यंत, त्याची प्रत्येक कथा प्रेक्षकांना वेगवेगळ्या भावनांनी भरलेल्या मजेदार प्रवासात घेऊन जाईल. नामांकित कलाकारांच्या उत्कृष्ट कामगिरीसह, मुंबई शहर या प्रत्येक कथेमध्ये एक मनोरंजक आयाम जोडणारे ठरते.” 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा  

Website | + posts

Leave a comment