आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Arjun Kapoor and Tabu starrer ‘Kuttey’ will release on 13 January 2023. लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सदद्वारा निर्मित आणि टी-सीरीटीजद्वारे प्रस्तुत असलेल्या ‘कुत्ते’या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. थरार आणि मनोरंजनाने भरपूर असलेल्या ‘कुत्ते’या चित्रपटात अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाज यांच्यासह प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे. तसेच, ‘कुत्ते’हा एक केपर-थ्रिलर असून, विशाल भारद्वाजचा मुलगा आसमान भारद्वाजच्या दिग्दर्शनातील हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट १३ जानेवारी २०२३ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

आसमान आणि विशाल भारद्वाजद्वारा लिखित, हा चित्रपट डार्क-कॉमेडी असून, चित्रपटाचे संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले आहे, तर त्यांचे सहकारी गुलजार यांनी गीते लिहिली आहेत.

‘कुत्ते’या चित्रपटाचे दिग्दर्शन आसमान भारद्वाज यांनी केले आहे. गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीटीजद्वारे प्रस्तुत, तसेच लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित हा चित्रपट पुढील वर्षी १३ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.