आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Kartik Aaryan’s romantic thriller ‘Freddy’ to release on Disney+ Hotstar on December 2. प्रेम, लग्न, विश्वासघात! प्रेमासाठी किंवा सूडासाठी कोण कुठल्या हद्दीपर्यंत जाऊ शकतो? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी डिज्नी+ हॉटस्टारने आज त्यांच्या आगामी रोमँटिक थ्रिलर ‘फ्रेडी’ चा टीझर जाहीर केला. बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेड, एनएच स्टुडिओज आणि नॉर्दर्न लाइट्स फिल्म्स निर्मित, शशांक घोष दिग्दर्शित आणि कार्तिक आर्यन आणि अलाया एफ अभिनीत हा चित्रपट 2 डिसेंबर 2022 रोजी केवळ डिज्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.

फ्रेडी ही डॉ. फ्रेडी जिनवाला (कार्तिक आर्यन) आणि कैनाज (अलया एफ) यांची कथा आहे. डॉ. फ्रेडी हा व्यवसायाने डेंटिस्ट असून त्याचा भूतकाळ अत्यंत क्लेशकारक अशा घटनांनी भरलेला आहे. तो एकलकोंडा असून तो त्याच्या मिनीएचर विमानांसोबत रमतो. त्याचा एकमेव मित्र आहे तो म्हणजे त्याचे पाळीव कासव ‘हार्डी’. कैनाज ही एक विवाहित स्त्री आहे, जिचा नवरा संशयी आणि अत्याचारी आहे. ती फ्रेडीच्या प्रेमात पडते. फ्रेडीला कैनाजशी लग्न करायचे आहे मात्र त्यातील ट्विस्टमुळे भावनांचा गोंधळ उडतो आणि त्याचे आयुष्य उलथपालथ होऊन जाते.

दिग्दर्शक शशांक घोष चित्रपटाबद्दल शेअर करताना म्हणाले, “एक प्रणय, एक विश्वासघात, एक सामान्य माणूस असाधारण होतो ही फ्रेडीची कथा आहे. फ्रेडीचे सामर्थ्य म्हणजे त्याचे प्रत्येक पात्र, संच आणि पार्श्वसंगीत यांचे अविश्वसनीय लेखन. अशा प्रकारच्या उपचारांसाठी कार्तिक आर्यन आणि अलाया एफ सारख्या सशक्त अभिनेत्यांची गरज होती. त्यांच्यामध्ये फ्रेडी आणि कैनाज सापडल्याबद्दल मला खूप आनंद झाला. या चित्रपटातील कार्तिक आर्यनच्या भूमिकेसह, त्याला यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात पाहून चाहते भारावून जाणार आहेत. बालाजी टेलिफिल्म्स, नॉर्दर्न लाइट्स फिल्म्स आणि डिस्ने+ हॉटस्टार यांनी मला दिलेल्या संधीबद्दल मी कृतज्ञ आहे, मला आशा आहे की प्रेक्षकांना चित्रपट आवडेल”

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

फ्रेडी या पात्राच्या तयारीवर प्रकाश टाकताना अभिनेता कार्तिक आर्यन म्हणाला, “फ्रेडी ही एक गुंतागुंतीची स्क्रिप्ट आणि पात्र होते, त्या व्यक्तिरेखेला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही तयार करावे लागले. या पात्राने मला माझ्या व्यक्तिरेखेची वेगळी बाजू आणि अभिनेता म्हणून प्रत्येक टप्प्यावर माझी क्षमता शोधण्यासाठी मदत केली. पहिल्यांदाच मला माझी काळी बाजू एक्सप्लोर करण्याची संधी दिली. डिज्नी+ हॉटस्टारसोबत हा चित्रपट लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. फ्रेडीचा भाग बनून मला आनंद होत असून चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.”

अभिनेत्री अलाया एफ म्हणाली, “फ्रेडीची कथा ऐकताच, मी त्याचा भाग होण्यासाठी होकार दिला. कैनाज हे माझ्यासाठी आव्हानात्मक पात्र होते, मला या पात्रात येण्यासाठी खूप काही शिकावे लागले आणि बऱ्याच गोष्टींचा त्याग देखील करावा लागला. मला ही संधी मिळाली त्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. फ्रेडीमुळे मला माझी क्षितिजे रुंदावण्यास मदत झाली. कार्तिक, शशांक सर आणि संपूर्ण टीममुळे हे शक्य झाले. डिज्नी+ हॉटस्टार वर चित्रपट प्रदर्शित होण्याची मी आतुरतेने वाट पाहत आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.