आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Actor Anupam Kher) यांनी आज त्यांच्या ५२० व्या चित्रपटाची घोषणा एका ट्विटद्वारे केली. यातच त्यांनी राजश्री फिल्म्सच्या आगामी ‘उंचाई’ (Uunchai) या सिनेमाची सुद्धा घोषणा केली असून हा चित्रपट अनुपम खेर यांचा ५२० वा चित्रपट ठरणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग आजपासून काठमांडू, नेपाळ येथे सुरु झाले आहे. (Anupam Kher Announces Rajshri Production’s Next film Uunchai, directed by Sooraj Barjatya)

राजश्री प्रोडक्शन निर्मित व सुरज बडजात्या दिग्दर्शित उंचाई या सिनेमात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, परिणीती चोप्रा, बोमन इराणी व नीना गुप्ता हे दिग्ग्ज कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाचा नायक कोण असणार याबद्दल अजून माहिती मिळू शकलेली नाही. हम आपके है कौन, विवाह, प्रेम रतन धन पायो या तीन चित्रपटानंतर सुरज बडजात्या यांच्या दिग्दर्शनाखाली उंचाई हा अनुपम खेर यांचा चौथा सिनेमा ठरणार आहे. राजश्री प्रोडक्शन निर्मित  ‘सारांश’ या चित्रपटाने अनुपम खेर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते ज्याचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले होते. 

सूरज बडजात्या यांच्या हातात सिनेमा शूटिंगचा क्लॅप असलेला फोटो ट्विट करीत आज अनुपम खेर यांनी उंचाई या सिनेमाची घोषणा केली. २०१५ साली प्रदर्शित व सलमान खान-सोनम कपूर अभिनीत प्रेम रतन धन पायो या सिनेमानंतर तब्बल ६ वर्षांनी सुरज बडजात्या यांनी उंचाई द्वारे दिग्दर्शनाची सूत्रे हातात घेतली आहेत. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.