आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Directed by Sumit Sanghmitra, ‘Lockdown Lagna’ is releasing on March 8.

अभिनेता हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर ‘लॉकडाऊन लग्न’  या चित्रपटात एकत्र आले आहेत. या चित्रपटात ते काका पुतण्याच्या भूमिकेत दिसणार असून, हार्दिक जोशी ‘काका मला वाचवा’ म्हणत आहे. तो असं का म्हणत आहे याचं उत्तर ८ मार्चला मिळणार आहे. 

अमोल कागणे प्रस्तुत “लॉकडाऊन लग्न” या चित्रपटाची निर्मिती लक्ष्मण कागणे, अमोल कागणे, सागर पाठक यांनी केली आहे. सुमित संघमित्र यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, तर अमोल गोळे यांनी चित्रपटाचं छायांकन केलं आहे. चित्रपटाच्या नावातच लॉकडाऊन असल्यामुळे चित्रपटातून कोरोना काळातली गोष्ट दाखवली जाणार असल्याचं स्पष्ट होतं. त्याशिवाय लग्नाशी संबंधित विषय असल्यानं काहीतरी मजेदार पहायला मिळणार यात शंका नाही.

हार्दिक जोशी आणि सुनील अभ्यंकर हे दोघंही कसलेले अभिनेते आहेत. काका-पुतण्याच्या भूमिकेत असलेल्या या दोघांनी या चित्रपटात धमाल उडवून दिली आहे. काका पुतण्यासाठी काय करतो? हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे हार्दिक जोशी  ‘काका मला वाचवा’ अशी साद सुनील अभ्यंकर यांना का घालत आहे, याचं उत्तर मिळण्यासाठी थोडेच दिवस थांबावं लागणार आहे.  

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

+ posts

Leave a comment