आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Directed by Digpal Lanjekar, ‘Shivarayancha Chhava’ will hit theaters on February 16

स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजविणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्वितीय व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या या महान योद्धयाचा इतिहास मराठी रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात दाखल होत आहे. ए.ए. फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटटेंमेंट या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.

त्याआधीच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ढोल-ताशांचा गजर, अभिनेता भूषण पाटील यांची छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशात दमदार एंट्री, छत्रपती संभाजीं महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या गाण्याचे नेत्रदीपक सादरीकरण, छत्रपती संभाजी महाराज यांचा जयघोष, अशा उत्साहपूर्ण भारावलेल्या वातावरणात ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटाचा रोमांचकारी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाची, शौर्याची, अजोड पराक्रमाची महती या साऱ्यांचा अनुभव देणारा हा चित्रपट नव्या पिढीला खूप काही शिकवणारा असेल, असा विश्वास दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी व्यक्त केला.

मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर,भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे,अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारे आदि कलाकारांच्या भूमिका ‘शिवरायांचा छावा’ चित्रपटात आहेत. कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

+ posts

Leave a comment