आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘सनक’ या होस्टेज ड्रामाच्या प्रदर्शनाआधी, विद्युत जामवालने आज लाईव्ह सादर केलेल्या हाई-ऑक्टेन ऍक्शनने सगळ्यांना थक्क केले. (Actor Vidyut Jammwal surprised everyone with his live high-octane stunt) बहुप्रतीक्षित एंटरटेनर ‘सनक – होप अंडर सीज’च्या अधिकृत ट्रेलरचे काउन्ट डाउन सुरू झाले असून लवकरच डिज्नी+ हॉटस्टारवर स्ट्रीम होणार आहे. मात्र, त्याआधी विद्युतने एका जळत्या एलईडी स्क्रीनला तोडत कार्यक्रमात बहारदार एंट्री घेतली आणि दर्शकांना चकित केले. या निमित्ताने ‘सनक’च्या निर्मात्यांनी उपस्थित सर्वांना लाईव्ह ऍक्शनचा अनुभव दिला ज्यामध्ये विद्युत जामवालला जवळून बघण्याची संधी मिळाली, जेव्हा अभिनेत्याने स्क्रीनचा चक्काचूर करत एक हीरोइक एंट्री घेतली.

कनिष्क वर्मा यांच्याद्वारे दिग्दर्शित ‘सनक’मध्ये प्रेक्षकांसमोर एक अशी शैली सादर करण्यात आली आहे, जिला अजूनपर्यंत जास्त एक्सप्लोर करण्यात आलेले नाहीये. या चित्रपटात विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि बंगाली स्टार रुक्मिणी मैत्रा दिसणार आहे, जी या होस्टेज ड्रामासोबत बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डिज्नी+ हॉटस्टारवर स्ट्रीम होण्यास पूर्णपणे सज्ज असून भावनात्मक सीन्स आणि नेक्स्ट लेवल ऍक्शनने ओतप्रोत भरली आहे कारण चित्रपटात एक हॉस्पिटल ओलीस ठेवण्यात आले आहे.

Actor Vidyut Jammwal surprised everyone with his live high-octane stunt

विद्युत जामवाल म्हणतो की, “सनकसोबत आम्ही दर्शकांसाठी एड्रेनालाईन अनुभव देण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याद्वारे आधी करण्यात आलेल्या सर्व एक्शन दृश्यांपेक्षा हटके काही करणे रोमांचक होते. तुम्हाला ‘सनक’ अवश्य पाहायला हवी आहे आणि सोबतच प्रेमासाठी सनकी माझी भूमिका देखील.”

निर्माते विपुल शाह म्हणतात की, “सनक – होप अंडर सीज’ एक एक्शनने भरपूर असा थ्रिलरपट असून, याचे कथानक एक व्यक्ती आपल्या प्रेमासाठी काय करू शकतो याच्या आसपास फिरते आणि हाच या कथेचा मुख्य गाभा आहे. प्रेम तुम्हाला कुठे नेऊ शकते याला काही सीमा नाही. आम्हाला बंगाली सुपरस्टार रुक्मिणी मैत्राला ‘सनक’च्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत सादर करताना आनंद होतो आहे. डिज़्नी+ हॉटस्टारसोबत सहयोग करणे आनंददायक आहे कारण चित्रपट चांगल्या तऱ्हेने चर्चेत राहण्यासाठी ते काहीच कसर सोडत नाहीयेत आणि आजच्या या मोठया इव्हेंटला देखील त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने सादर केले आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनीत, ‘सनक – होप अंडर सीज’ झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत असून 15 ऑक्टोबरपासून केवळ डिज्नी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर स्ट्रीम करेल. हा विपुल अमृतलाल शाह प्रोडक्शनचा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment