आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

अमेझॉन प्राइम व्हिडिओने आज कारगिल येथे बहुप्रतिक्षित शेरशाहचा चित्रपटाचा ट्रेलर कारगिल विजय दिवस सेलिब्रेशन च्या कार्यक्रमामध्ये लाँच केला. (Amazon Prime Video launches the trailer of Shershaah at Kargil Vijay Divas Celebrations in Kargil)

कारगिल युद्धाच्या नायकांचा सन्मान करण्यासाठी आयोजित हा वार्षिक उत्सव चित्रपटाच्या ट्रेलर अनावरणासाठी एक आदर्श व्यासपीठ होता आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, दिग्दर्शक विष्णु वर्धन, निर्माता करण जोहर, अपूर्व मेहता आणि दिग्दर्शक विजय सुब्रमण्यम हे सर्व याप्रसंगी उपस्थित होते. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या या चित्रपटामुळे बत्रा यांची “ये दिल मांगे मोर” ही ललकारी देशाच्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा घुमणार आहे.

शेरशहा ट्रेलर लिंक – 

विष्णु वर्धन यांच्याद्वारे दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शंस व काश एंटरटेनमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटात, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘शेरशहा’ १२ ऑगस्ट, २०२१ पासून अमेझॉन प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होणार आहे.

हेही वाचा – करण जोहर वूट वरील “बिग बॉस ओटीटी” शो करणार होस्ट

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.