टेलिव्हिजनवरील लोकप्रि‍य मालिकांपैकी एक सोनी बसवरील मालिका ‘वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से’ (Sony SAB’s Wagle Ki Duniya – Nayi Peedhi Naye Kissey) नवीन एपिसोड्ससह परतत आहे. मालिका टेलिव्हिजन विश्‍वातील जुन्‍या आठवडणींना उजाळा देत विलक्षण दैनंदिन कथांना सादर करणे सुरूच ठेवेल आणि लक्षवेधक पटकथेसह प्रेक्षकांचे मनोरंजन करेल.

राजेश वागले (सुमीत राघवन) कुटुंबासोबत उत्तम वेळ व्‍यतित करण्‍यासाठी त्‍यांना सुट्टीनिमित्त रिसोर्टवर घेऊन जातो. पण तेथे पोहोचल्‍यानंतर त्‍याला समजते की, त्‍याच्‍या सूटकेसची अदलाबदल झाली आहे. वंदना (परिवा प्रणती) रिसॉर्टच्‍या कर्मचा-यांच्‍या मदतीने राजेशसाठी काही कपड्यांची व्‍यवस्‍था करते. यादरम्‍यान पूर्णत: लॉकडाऊनची घोषणा करण्‍यात येते, ज्‍यामुळे मुले अत्‍यंत दु:खी व निराश होतात. राजेश मुलांच्‍या मनोरंजनासाठी उत्तम युक्‍ती लढवतो आणि त्‍यांना अवघड स्थितींशी जुळवून घेण्‍याची उत्तम शिकवण देतो. तो सर्व्‍हायवल गेमची योजना आखतो, जेथे मुलांना तग धरून राहण्‍यासाठी अन्‍न व पाणी आणावे लागते. हर्षद (अमित सोनी) व ज्‍योती (भक्‍ती चौहान) हे रिसॉर्टमध्‍ये वागले कुटुंबाला भेटतात आणि ते देखील आनंदाने या गेममध्‍ये सहभाग घेतात.

राजेशची भूमिका साकारत असलेले सुमीत राघवन म्‍हणाले,”आमच्‍या चाहत्‍यांसाठी नवीन एपिसोड्ससह परतल्‍याने खूपच चांगले वाटत आहे. आम्‍ही प्रेक्षकांच्‍या लिव्हिंग रूम मनोरंजनाने भरण्‍यासाठी आणि अशा आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये सकारात्‍मकता व आनंदाचा प्रसार करण्‍यासाठी सर्वतोपरी मेहनत घेत आहोत. राजेश मुलांना जीवनातील गोष्‍टींचा आनंद घेण्‍याचे महत्त्व सांगण्‍याचा आणि त्‍याच्‍यापरीने जीवनाबाबत शिकवण देण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. म्‍हणून मी माझ्या सर्व चाहत्‍यांना घरीच राहण्‍याचे आवाहन करतो. मी आशा करतो की, हे नवीन एपिसोड्स तुम्‍हाला उत्‍साहित करण्‍यासोबत आनंद पसरवतील.”

वंदनाची भूमिका साकारणा-या परिवा प्रणती म्‍हणाल्‍या,”मालिका ‘वागले की दुनिया’च्‍या माध्‍यमातून आम्‍ही अर्थपूर्ण व मूल्याधारित स्निपेट्स सादर करण्‍याचा, तसेच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍याचा प्रयत्‍न करत आलो आहोत. मला आमच्‍या चाहत्‍यांसाठी नवीन एपिसोड्स सादर करण्‍याकरिता सेटवर परतण्‍याचा आनंद होत आहे. टीम सेटवर कडक सुरक्षितता व स्‍वच्‍छताविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहे. मी आशा करतो की, प्रेक्षकांसाठी आगामी पटकथा सर्वसमोवशक व रोमांचक असेल आणि यामुळे मनोरंजनाचा दर्जा नव्‍या उंचीवर पोहोचेल. तर मग मालिका पाहत राहा आणि घरामध्‍येच सुरक्षित राहत आरामातनवीन एपिसोड्स पाहण्‍याचा आनंद घ्‍या.”

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.