आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

नुकत्याच जाहीर झालेल्या “बिग बॉस ओटीटी” च्या लाँच नंतर, आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे की, दिग्दर्शक, निर्माता आणि आयकॉन करण जोहर ब्लॉकबस्टर होस्ट म्हणून बिग बॉस ओटीटीमध्ये सामील झाले आहेत. वूटवर चालणाऱ्या सहा आठवड्यांच्या या शोसाठी करण जोहर बिग बॉस ओटीटीच्या नाटक आणि मेलोड्रामाचे अँकरिंग करणार आहे. (Karan Johar to Host India’s Biggest Reality show- Bigg Boss OTT on Voot)

बिग बॉसच्या चाहत्यांना प्रथमच सर्व ड्रामा आणि अ‍ॅक्शन २४ तास घरातून थेट पाहायला मिळतील. याशिवाय बिग बॉसच्या चाहत्यांना वूट वर १ तासांचा भाग दाखवण्यात येईल, या व्यतिरिक्त दर्शकांना एक्सक्लूसिव कट्स, २४ तास कंटेंट आणि संपूर्ण इंटरएक्टिव्ह आवृत्ती पाहण्याची संधी देखील मिळणार आहे. डिजिटल एक्सक्लुझिव्ह पूर्ण झाल्यानंतर शो बिग बॉसच्या सीझन 15 च्या लाँचिंगसह कलर्सवर अखंडपणे पुढे जाईल.अभूतपूर्व पोहोच, व्यस्तता आणि परस्परसंवादासह 8 ऑगस्ट 2021 रोजी बिग बॉस ओटीटी प्रेक्षकांना स्पर्धकांच्या प्रवासात स्वतःला गुंग करण्यास मदत करेल. 

व्हूटवर बिग बॉस ओटीटी होस्टच्या त्याच्या नव्या भूमिकेविषयी करण जोहर म्हणाला, ‘मी आणि माझी आई बिग बॉसचे प्रचंड चाहते आहोत आणि एक दिवस ही आम्ही शो चुकवत नाही. एक प्रेक्षक म्हणून हा नाटकिय ड्रामा माझे खूप मनोरंजन करते. अनेक दशकांपासून मी बर्‍याच कार्यक्रमांचे होस्टिंग करण्याचा आनंद घेतला आहे आणि त्यात बिग बॉस ओटीटी नक्कीच अव्वल असेल. हे माझ्या आईचे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे आहे. बिग बॉस ओटीटी निःसंशयपणे जास्त खळबळजनक आणि नाट्यमय असेल. मला आशा आहे की मी प्रेक्षकांच्या आणि माझ्या मित्रांच्या अपेक्षेवर खरा उतरेन, तसेच माझ्या स्वत: च्या स्टाईलमध्ये स्पर्धकांसमवेत ‘वीकेंड का वार’ मजेदार बनवून, मनोरंजनाच्या पातळीचा स्थर अजून उंचावेन. त्यासाठी प्रतीक्षा करा! “

हेही वाचा – इटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’

Website | + posts

Leave a comment