(फोटोत डावीकडून श्री.रवींद्र जोशी, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भास्कर जाधव, राजदर्शन दानवे, जयश्री दानवे.)

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

कोल्हापूर : कोरोना आणि महापूराच्या काळात दयनीय दशा झालेल्या वाचनालयांसाठी सह्याद्री प्रकाशनातर्फे पुस्तक भेट उपक्रमासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याचाच एक भाग म्हणून नट़श्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या 36 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून त्यांच्या कन्या जयश्री दानवे आणि सुपुत्र राजदर्शन दानवे यांनी 200 पुस्तके अक्षर दालन चे रविंद्र जोंशी यांच्याकडे सुपुर्द केली. (Actor Jaishankar Danve’s 36th Death Anniversary Program held at Kolhapur)

ही भेट ज्येष्ठ दिग्दर्शक, लेखक भास्कर जाधव यांच्या हस्ते देण्यात आली.कोळेकर तिकटी येथील अक्षर दालन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी दिग्दर्शक भास्कर जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना जयशंकर दानवे यांच्या आठवणींना उजाळा दिला. एक गुरु, शिक्षक, अभिनेता, दिग्दर्शक आणि एक माणूस म्हणून जयशंकर दानवे कसे होते… याची ओळख करुन दिली.

यानंतर पुस्तके भेट देण्यात आली. या पुस्तकांमध्ये आरती भागवत, मेधा जाधव, प्रा. सुजय पाटील आणि जयश्री दानवे यांच्या पुस्तकांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे स्वागत प्रस्ताविक जयश्री दानवे यांनी केले. तर आभार राजदर्शन दानवे यांनी मानले. यावेळी सुधीर पेटकर, रविंद्र जोशी यांच्यासह साहित्यप्रेमी उपस्थित होते. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment