आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
The teaser of Marathi Movie ‘Lochya Zaala Re’ launched. Film releasing on February 4. अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे यांचा ‘लोच्या झाला रे’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचे टिझर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून यात आपल्याला अंकुश, सिद्धार्थ व वैदेही यांच्यात चाललेला गोंधळ दिसून येत आहे. सगळ्यांचाच हा गोंधळ आणि पळापळ कशासाठी सुरु आहे, कोणाच्या आयुष्यात लोच्या झाला आहे. या सगळ्याचीच उत्तरे आपल्याला ४ फेब्रुवारीला मिळणार आहेत.
‘लोच्या झाला रे’चे चित्रीकरण सुमारे एक महिना लंडनमध्ये पार पडले. तिथल्या सततच्या बदलत्या हवामानामुळे चित्रीकरणादरम्यान कलाकारांसह इतर टीमलाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.
‘लोच्या झाला रे’च्या लंडनमधील चित्रीकरणाच्या अनुभवाबाबत दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, ‘’मला वैदेही आणि सिद्धार्थचे विशेष कौतुक करावेसे वाटते कारण लंडनमधील कडाक्याची थंडी पाहता, वैदेहीचा भूमिकेला अनुसरून असलेला पेहराव तेथील थंडीला अनुकूल नसल्याने तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तरी ब्लॅंकेटचा सहारा घेत तिने संपूर्ण शूटिंग उत्तमरित्या पार पाडले. सिद्धार्थचेही बरेच सीन्स हे शॉर्ट्समध्ये असल्याने त्यालाही थंडीचा सामना करावा लागला. मात्र कोणीही तक्रार केली नाही. या चित्रपटात कलाकारांनी जेवढी मेहनत घेतली आहे तेवढीच मेहनत पडद्या मागील सदस्यांनीही घेतली आहे म्हणूनच आमच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत यशस्वी होईल व प्रेक्षकवर्ग या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतील, अशी मला अपेक्षा आहे .
‘लोच्या झाला रे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी केले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे.