आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम
————————
मालिका ‘शुभ लाभ – आपके घर में’ सुरू होत आहे १३ सष्टेंबरपासून दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता सोनी सबवर. (Shubh Laabh – Aapkey Ghar Mein is set to premiere on 13th Sept. on Sony SAB)
संपत्ती व समृद्धी कशी मिळवावी? देवी लक्ष्मीला प्रसन्न केल्यास अमाप संपत्ती मिळेल का? सोनी सबवरील नवीन मालिका ‘शुभ लाभ – आपके घर में’ सामान्य विश्वास असलेल्या विचारांना, तसेच ख-या भक्तीचा अर्थ आणि स्वयं-परिवर्तनाच्या महत्त्वाला दाखवेल. ही मालिका पात्रांमधील परिवर्तनात्मक प्रवासाला दाखवते, जेथे त्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनात भक्ती व आध्यात्मिकतादरम्यान संतुलन राखण्याचे समजेल.
रतलाममधील तोश्नीवाल परिवार इतर भारतीय कुटुंबांप्रमाणे दैनंदिन जीवनात आव्हाने व संघर्षांचा सामना करतो आणि त्यांची जीवन समृद्ध असण्याची इच्छा आहे. सविता तोश्नीवाल (गीतांजली टिकेकर) आणि तिचा पती निरंजन तोश्नीवाल (नासीर खान) नमकीन (स्नॅक) व्यवसाय चालवतात. हा व्यवसाय नुकसानाचा सामना करत असल्यामुळे कुटुंबाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. गृहिणी असण्यासोबत देवता लक्ष्मीची निस्सीम भक्त असलेल्या सविताला या पडझडीमधून तिच्या संपूर्ण कुटुंबाला सावरण्याची जबाबदारी जाणवते. दैवी चमत्कारावर खूपच विश्वास असलेली ती तिच्या क्षमतेनुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करते. ती तिचे कमनशिबी भाग्य बदलण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाही आणि या संघर्षांमधून संरक्षण होण्यासाठी चमत्कार होण्याची अपेक्षा करते. पण सर्व प्रयत्न करून देखील स्थिती बदलत नाही तेव्हा तिला मनात प्रकर्षाने जाणवते की, ‘देवी लक्ष्मी तिच्या घरावर केव्हा प्रसन्न होणार?’
जय प्रॉडक्शन्स निर्मित मालिका ‘शुभ लाभ – आपके घर में’ पात्र व कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत त्यांना प्रेरित करण्याचा आणि ‘खुशियों वाली फिलिंग’चा प्रसार करण्याचा मनसुबा असलेल्या सोनी सबवरील सर्वोत्तम मालिकांममध्ये नवीन भर आहे. या मालिकेमध्ये सविताचा मोठा मुलगा रोहितच्या भूमिकेत मितिल जैन, सविताचा लहान मुलगा वैभवच्या भूमिकेत मनन जोशी आणि सविताची मुलगी रूहीच्या भूमिकेत माही शर्मा हे कलाकार देखील आहेत.
श्री. नीरज व्यास, व्यवसाय प्रमुख – सोनी सब, याविषयी बोलतांना म्हणाले की ”सोनी सबमध्ये आम्ही वैविध्यपूर्ण असण्याच्या आमच्या दृष्टिकोनाच्या दिशेने स्थिरगतीने वाटचाल करत आहोत आणि आमची नवीन मालिका ‘शुभ लाभ – आपके घर में’ याच दिशेने एक पाऊल आहे. नियमांना आव्हान करणे हे आमच्यासाठी प्रमुख तत्त्व राहिले आहे आणि आम्ही प्रथा व स्वयं-परिवर्तनामधील फरकाला सादर करणारी नवीन मालिका घेऊन येत असलो तरी ते कोणत्याही नकारात्मक ड्रामाशिवाय करत आहोत.”