————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेला, मकरंद माने लिखित-दिग्दर्शित ‘सोयरीक’ (Soyarik Marathi Film) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. कौटुंबिक धाटणीच्या या मनोरंजक चित्रपटाचा मुहूर्त अकलूज येथे चित्रीकरणाने संपन्न झाला. अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘पोरगं मजेतय’ या मराठी चित्रपटाच्या निर्मिती नंतर ‘सोयरीक’ या चित्रपटाद्वारे हे तिघेही पुन्हा एकत्र आले आहेत.(shooting of forthcoming marathi film soyarik commenced)

‘सोयरीक’ जुळणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना. आणि ती कधी? कुठे? आणि कशी जुळेल? या सुद्धा नशीबाच्या आणि योगायोगाच्या गोष्टी असतात. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी सुद्धा आपली ‘सोयरीक’ चांगलीच जुळून आणली आहे.‘नातं’.. म्हणायला जेवढा सोपा शब्द आहे तेवढाच जपायला कठीण आहे. मग तो जपताना त्यात सुरू होते ती स्वार्थ अन निस्वार्थची लढाई. ह्यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची ‘सोयरीक’ अवलंबून असते आणि तेच मांडायचा प्रयत्न आम्ही करीत आहोत, असे दिग्दर्शक मकरंद माने सांगतात.

shooting of forthcoming marathi film soyarik commenced

सध्याच्या कठीण काळात प्रत्येकालाच नात्याची व त्यातल्या आपलेपणाची जाणीव प्रकर्षाने होऊ लागली आहे. आजवर आपल्या चित्रपटांतून सामाजिकतेचा वेध घेणारे दिग्दर्शक मकरंद माने ‘सोयरीक’ या चित्रपटातून नात्यांची मनोरंजक सफर प्रेक्षकांना घडविणार आहेत. या चित्रपटाबद्दल निर्माते विजय शिंदे, मकरंद माने, शशांक शेंडे उत्सुक असून काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा आमचा हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास हे तिघेही व्यक्त करतात.

हेही वाचा – नितीश तिवारी दिग्दर्शित केबीसीच्या 3-पार्ट शॉर्टफिलम्चे अनावरण

Website | + posts

Leave a comment