जीव झाला येडापिसा मालिकेने गाठला ५०० भागांचा पल्ला !

 ‘५०० भागांचं जिवापाड नातं जुळलं, शिवा – सिद्धीच प्रेम धगधगत्या निखार्‍यातून फुललं’…

मालिका सुरू होताच संपूर्ण महाराष्ट्राचा जीव यांवर जडला… प्रेक्षकांची मने मालिकेतील सर्वच पात्रांनी जिंकली… द्वेषातून सुरू झालेलं शिवा सिध्दीचे नाते प्रेमाने बहरलं… कठीण परिस्थितीला या दोघांनी खंबीरपणे, मोठ्या धीराने तोंड दिले… अनेक आव्हानं, कसोट्या पार केल्यानंतर आता आपली लाडकी सिध्दी आणि रांगडा शिवादादा यांच्या आयुष्यात सुखाचे क्षण आले आहेत… सिद्धीने घरी ती आई होणार अशी गोड बातमी दिली… सिध्दीने ही गोड बातमीच देताच दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही… मंगलंने सिद्धिचा नेहेमीच दुस्वास केला पण तरीही सिद्धीने त्यांना माया आणि सन्मान दिला…यासगळ्यात काकी, सोनी, यशवंत यांची साथ सिध्दी – शिवाला कायमच मिळत आहे… सगळे गैरसमज, भांडण सरून आता दोघांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले… मालिकेमध्ये बर्‍याच घटना घडत आहेत… पण यातच आनंदाची बातमी नुकताच मालिकेने गाठला ५०० भागांचा गाठला पल्ला आहे…

jeev jhala yedapisa 500 episodes celebration

प्रेक्षकांच्या मिळणार्‍या भरघोस प्रतिसादामुळेच हे शक्य झाले… यादीवशी संपूर्ण टीमने सेटवर मज्जा मस्ती केली… दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला, फोटोज काढले, केक कट केला. “५०० भागांच्या पूर्णत्वाने मनोरंजनाचा जपला वसा, रसिक प्रेक्षकांच्या मिळणार्‍या या उदंड प्रतिसादाने “जीव झाला येडापिसा”… असं म्हणायला हरकत नाही… 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.