शाहरुख खान व सुजॉय घोष यांची निर्मिती व दिया अन्नपूर्णा घोष हिचे दिग्दर्शन लाभलेला आगामी बॉब बिस्वास या चित्रपटाच्या सेट्स वरील काही फोटोज आज सोशल मीडियावर आले आहेत. अभिषेक बच्चन ने साकारलेल्या बॉब बिस्वास च्या प्रमुख भूमिकेसाठी त्याने स्वतःमध्ये घडवून आणलेला बदल आश्चर्यचकित करणारा आहे. त्याने वाढवलेले वजन, केसांचा लूक, मोठा चष्मा, इन केलेला फॉर्मल शर्ट व लूझ फॉर्मल पॅन्ट या वेशभूषेत तो कमालीचा दिसत आहे.

अभिषेकच्या फॅन्सला सोशल मीडियावर आलेला हा लूक कमालीचा आवडत आहे. बॉब बिस्वास चे पहिले शूटिंग शेड्युल फेब्रुवारी मध्येच संपले होते परंतु कोरोना लॉकडाऊन मुळे पुढचे शूटिंग लांबणीवर पडले होते जे आता परत कोलकाता येथे सुरु आहे. 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.