‘फनरल’, ‘प्रवास’, ‘प्रीतम’, ‘अन्य’, ‘काळी माती’ या चित्रपटांची बाजी

‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ’ आणि ‘अंबर भरारी’ आयोजित ६ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव २०२० ची नामांकने आज जाहीर करण्यात आली. कोरोनाच्या प्रतिकूल काळातही अडचणींवर मात करून या चित्रपट महोत्सवाचे आयोजन होत असल्याने चित्रपटसृष्टीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महोत्सवामध्ये दाखल झालेले बहुतेक सर्वच चित्रपट आशय, विषय हाताळणी, तांत्रिक बाबी, दिग्दर्शन, निर्मिती मूल्य इ. निकषांमध्ये सरस असल्याने नामांकनामध्ये मोठी चुरस बघावयास मिळत आहे.

महोत्सवात दाखल एकूण ४७ पैकी २८ चित्रपट नामांकनाच्या यादीमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत . त्यामध्ये ‘फनरल’, ‘प्रवास’, ‘प्रीतम’, ‘अन्य’, ‘काळी माती’, ‘निबार’, ‘इमेल फिमेल’ या चित्रपटांनी विविध विभागांमध्ये नामांकने मिळवत बाजी मारली आहे. घोषित पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ‘काळी माती’, सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता निखील रत्नपारखी, सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक भक्ती जाधव (चित्रपट इमेल फिमेल) सर्वोत्कृष्ट निर्मिती व्यवस्थापक अजय खाडे यांचा समावेश आहे. परीक्षक विशेष पुरस्कार चित्रपट ‘श्री राम समर्थ’ या चित्रपटास जाहीर झाला असून सर्वोत्कृष्ट अभिनेता परीक्षक पुरस्कार शंतनू मोघे यांना ‘श्री राम समर्थ’ या चित्रपटासाठी तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री परीक्षक पुरस्कार परी जाधव यांना ‘आवर्तन’ या चित्रपटासाठी घोषित करण्यात आला आहे. ज्येष्ठ संकलक व्ही एन मयेकर यांना ‘तंत्रज्ञ गौरव पुरस्कार’ तर गणेश आचवल यांना ‘सिने पत्रकारिता गौरव पुरस्कार ‘ जाहीर करण्यात आला आहे. ‘चित्रपट समीक्षक गौरव विशेष पुरस्कार’ चित्रपट समीक्षक वैष्णवी कानविंदे यांना घोषित करण्यात आला आहे. गेली अनेक वर्षे नाटक, चित्रपट दूरचित्रवाणी अशा विविध माध्यमातून उत्तमोतम भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना ‘ कारकीर्द सन्मान पुरस्कार’ घोषित करण्यात आला आहे. विविध भूमिकांच्या माध्यमातून आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या प्रतिभावंत ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना यावर्षीचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

shrikant moghejyoti chandekar

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतल्या नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यामध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाईल, असे ‘अंबर भरारी’ महोत्सवाचे संस्थापक सुनील चौधरी, AMFF आयोजक निखील चौधरी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि महोत्सव दिग्दर्शक महेंद्र पाटील यांनी जाहीर केले आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.