बहुप्रतिक्षित चित्रपट ‘राधेश्याम’ (Radhe Shyam film) च्या नव्या पोस्टरने प्रत्येकाला रिलीजबाबत उत्सुक केले आहे. प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या पहिल्या लुकपासून ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काही झलकींपर्यंत. चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रभासच्या काही नव्या पोस्टर्ससह देशभरातील प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पोस्टरमध्ये प्रभास (Prabhas) त्याच्या रेट्रो अवतारात तपकिरी रंगाच्या टर्टल नेकमध्ये दिसतो आहे ज्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल आणि एकूणच चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. या पोस्टरच्या माध्यमातून देशातील अनेक उत्सव- जसे की गुढी पाडवा, उगाडी, नवरेह बैसाखी, बोहाग बिहू आणि असे इतर अनेक सण, यांच्यासाठी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

निर्मात्यांनी हे पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले, “Many Festivals. One Love! 💞
Here’s wishing everyone a very #HappyUgadi, Gudi Padwa, Baisakhi, Vishu, Puthandu, Jur Sithal, Cheti Chand, Bohag Bihu, Navreh & Poila Boshak! #30JulWithRS

Starring #Prabhas & @hegdepooja

चित्रपटाच्या या नव्या झलकीसह, राधेश्याम एक रोमांचक चित्रपटाचे वचन देतो, जेथे प्रभास एक दशकानंतर रोमँटिक शैलीत सादर होत आहे. चित्रपटाची प्रत्येक झलक त्यातील भव्यतेला प्रतिबिंबित करते. खरोखरच, प्रेक्षकांसाठी ही अनोखी पर्वणी आहे.

राधेश्याम या रोमँटिक-नाट्य असलेल्या चित्रपटात पूजा हेगडे (Pooja Hegde) प्रभासच्या नायिकेच्या रुपात दिसणार आहे. दशकानंतर हा अभिनेता रोमँटिक भूमिकेत दिसणार असून या पोस्टरने सर्वांना नक्कीच उत्साहीत केले आहे. रोमच्या पार्श्वभूमीवर बेतलेल्या या चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमधून राष्ट्राची विविधता आणि भाषेचा उत्सव साजरा करण्याचा हा अनोखा प्रयत्न चित्रपटाला नव्या स्तरावर घेऊन जातो.

हा चित्रपट 30 जुलै 2021 रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटातील पॅन-इंडिया स्टार प्रभाससह सुंदर अभिनेत्री पूजा हेगडे यांच्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा आहे. ‘राधेश्याम’ हा राधा कृष्ण कुमार दिग्दर्शित बहुभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सिरीज सादर करणार आहेत. यूव्ही क्रिएशन्सद्वारे तयार या चित्रपटात प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत असून सचिन खेडकर, प्रियदर्शी, भाग्यश्री, मुरली शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केली आहे.

Website | + posts

Leave a comment