आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

सोनी मराठी (Sony Marathi) पहिल्यांदाच घेऊन येत आहे ‘इंडियन आयडल – मराठी’!  (Indian Idol- Marathi) या कार्यक्रमाचे परीक्षण संगीतसृष्टीतील दिग्गज जोडी अजय आणि अतुल करणार आहेत. पुण्यात नारायण पेठ येथे भित्तिचित्राद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली या वेळी पुण्याचे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ, सोनी मराठी वाहिनीचे बिजनेस हेड श्री. अजय भाळवणकर, क्रिएटिव्ह डिरेक्टर श्री. अमित फाळके आणि फ्रीमेन्टल निर्मिती संस्थेचे केशव कौल उपस्थित होते. (Music Director Duo Ajay-Atul will judge the first ‘Indian Idol-Marathi’ program on Sony Marathi)

या जोडीनी आपल्या सांगीतिक प्रवासाला पुण्यातून सुरुवात केली आणि पुण्यात या भित्तचित्राद्वारे त्या दोघांचं नाव ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून घोषित करण्यात आलं. निखिल सतिश खैरनार या कलाकारानी हे भित्तिचित्र काढलं आहे.

‘अजय-अतुल’ या जोडीनी आत्तापर्यंत उत्तम आणि दर्जेदार कलाकृती  दिल्या आहेत त्याचप्रमाणे इंडियन आयडल या मंचानंही संगीतसृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत. फ्रीमेन्टल या निर्मिती संस्थेनी ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. ‘इंडियन आयडल – मराठी’ या कार्यक्रमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स ‘सोनी लिव्ह’वर सुरू झाल्या आहेत. 

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment