आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

२२ ऑक्टोबरपासून सिनेमागृहे सुरु होणार असल्याची बातमी आली आणि इतके महिने आतुरतेने वाट पाहणाऱ्या चित्रपटसृष्टी आणि चित्रपटप्रेमींमध्ये एक उत्साहाचे आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या प्रदर्शनाच्या तारखाही आता जाहीर होऊ लागल्या आहेत. त्यापैकीच एक एसजीएम फिल्म्स प्रस्तुत ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे नवीन पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून हा चित्रपट १७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. (Marathi film ‘Free Hit Danka’ is releasing on December 17)

सुनील मगरे दिग्दर्शित या चित्रपटात फँड्री’ फेम सोमनाथ अवघडे, अपूर्व एस.यांच्यासह ‘सैराट’ चित्रपटातील जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा आणि पटकथा सुनील मगरे यांचीच असून, लेखन आणि संवाद संजय नवगीरे यांचे आहेत. आकाश अलका बापू ठोंबरे, मेघनाथ गुरुनाथ सोरखडे आणि सुनिल मगरे चित्रपटाचे निर्माते आहेत तर नितीन बापू खरात, सुधाकर लोखंडे आणि सत्यम तरडे यांनी सहनिर्मात्यांची धुरा सांभाळली आहे.

प्रेमाच्या महिन्याचे औचित्य साधून या प्रेमकथा असलेल्या ‘फ्री हिट दणका’ या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. आता लवकरच प्रेक्षकांना या प्रेमाचा दणका चित्रपटगृहात पाहाता येणार आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.