आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Senior journalist and writer Shirish Kanekar passed away

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचं वयाच्या 80 व्या वर्षी निधन झालं. प्रकृती अत्यावस्थामुळे गेले काही दिवस त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते.. पण रुग्णालयातच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मुंबई विद्यापिठातून वकीलीची पदवी घेतल्यावर ते इंडियन एक्स्प्रेस वृत्तसमूहात पत्रकार म्हणून नोकरीला लागले. पुढे त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात दीर्घकाळ मुशाफिरी केली. बॉलीवूड, आणि मराठी चित्रपट सृष्टीवरील त्याचं खुमासदार शैलीतील लेखन कायम रसिकांच्या स्मरणात राहील. हिन्दी चित्रपटाविषयी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये ‘गाये चला जा’, ‘यादो की बारात’, ‘शिरिषासन’, ‘फिल्लमबाजी’ , ‘पुन्हा शिरिषासन’,  ‘कणेकरी’, ‘नट बोलट बोलपट’, ‘शिनेमा डॉट कॉम ‘ ही काही गाजलेली नावे आहेत. त्यांच्या इतर गाजलेल्या पुस्तकांमध्ये :’रहस्यवल्ली’ , ‘चाहटळणी’ , ‘इरसालकी’ , ‘चापलूसरकी’ , ‘साखरफुटाणे’ , ‘गोली मार भेजेमें’, ‘सुरपारंब्या’ , ‘लगाव बत्ती’ , डॉ. काणेकरांचा मुलगा , मखलाशी , मनमुराद , नानकटाई , खटल आणि खटला, चापटपोळी, मेतकूट, फटकेबाजी, तिकडमबाजी, आंबटचिंबट, मोतिया, चंची, कट्टा , एककेचाळीस, टिवल्या बावल्या , कुरापत, यारदोस्त इत्यादी चा समावेश आहे. 

6 जून 1943 रोजी पुण्यात शिरीष कणेकर यांचा जन्म झाला. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पेण हे कणेकरांचे मूळ गाव. शिरीष कणेकर यांचे वडिल रेल्वे विभागात डॉक्टर होते. त्यामुळे कणेकर यांचं बालपन मुंबईतल्या भायखळा इथल्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात केलं. लेखक, पत्रकार म्हणून त्यांनी आपली वेगळ ओळख निर्माण केली. मनोरंजन आणि क्रीडा पत्रकारीतेतही ते ख्यातनाम होते. शिरीष कणेकर यांचा माझी फिल्लमबाजी हा कार्यक्रम प्रचंड गाजला. क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील गमती-जमती हे त्यांच्या कार्यक्रमाचं स्वरुप होतं. शिरीष लता मंगेशकर आणि दिलीप कुमार यांचे परमभक्त होते. ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment