जगभरातून वाहवा मिळवल्यानंतर मानसी आणि वीरची हृदयस्पर्शी कथा ‘हम भी अकेले, तुम भी अकेले’ (Hum Bhi Akele, Tum Bhi Akele ) प्रेम, जीवन आणि मैत्रीचे वर्णन करणारी कथा डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी (Disney+Hotstar VIP) वर येणार आहे. अभिनेत्री झरीन खान आणि अंशुमन झा मानसी आणि वीर यांच्या भूमिकेत आहेत. हे दोघे एकमेकांना ओळखत नाहीत आणि ते दोघेही एलजीबीटी + समुदायाचे सदस्य आहेत. त्यांच्यात बर्‍याच गोष्टी एकसारख्या आहेत हेदेखील त्यांना ठाऊक नसते. ते दोघे मिळून रोड ट्रिपवर जातात जे त्यांच्यासाठी आयुष्यभर संस्मरणीय प्रवास ठरतो; ते दिल्लीहून मॅकलॉडगंजला जाताना, वीर आणि मानसीला समजते की प्रेम हे लैंगिकतेपेक्षा काही वेगळे आहे.

या चित्रपटाला बर्‍याच आंतरराष्ट्रीय चित्रपट समीक्षकांचे कौतुक, तसेच न्यूयॉर्कमधील ‘एचबीओ दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ येथे सर्वोत्कृष्ट चित्रपट-प्रेक्षक चॉईस पुरस्कार मिळाला. २०२० च्या राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘हम भी अकेले, तुम भी अकेले’ ने ‘ज्युरी अवॉर्ड बेस्ट अ‍ॅक्टर’ (अंशुमन झा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हिंदी (जरीन खान) आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (हरीश व्यास) पुरस्कारही जिंकला. 2020 मध्ये ‘आयएफएफएम मेलबर्न’ हा चित्रपट आकर्षणाचे केंद्र बनला आणि आशियातील सर्वात मोठा एलजीबीटीक्यू चित्रपट महोत्सव ‘काशिश 2020 मधील क्लोजिंग नाईट गाला चित्रपट होता. हरीश व्यास यांनी या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून फर्स्ट रे फिल्म्स यांनी निर्मित केले. या चित्रपटात मुख्य पात्र आणि त्यांच्या सुंदर प्रवासामध्ये समलैंगिकता, मैत्री आणि प्रेम चित्रित केले आहे. 

‘हम भी अकेले, तुम भी अकेले’ डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपी आणि डिस्ने + हॉटस्टार प्रीमियमवर 9 मे 2021 रोजी रिलीज होईल.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.