आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Veteran Marathi Drama Actress and Singer Kirti shiledar died in Pune ज्येष्ठ गायिका आणि रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांचं आज निधन झालं आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सकाळी त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. डायलिसिसचे उपचार सुरू असल्याने त्यांची तब्येत आणखी खालावली.  

वयाच्या दहाव्या वर्षी कीर्तीताईंनी रंगभूमीवर पदार्पण केलं. जवळपास पाच दशकं त्यांनी नाट्यसंगीतात योगदान दिलं. आपल्या अभिनयाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर वेगळा ठसा उमटवला होता. त्याचे वडील जयराम शिलेदार यांनी व्ही. शांताराम यांच्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. मागील ६० वर्षांत आपल्या चतुरस्र अभिनयानाने व गायनाने त्यांनी रंगभूमीवर स्वत:चा ठसा उमटवला होता. जयराम आणि जयमाला शिलेदार या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या कीर्ती शिलेदार यांनी मराठी रंगभूमीसाठी बहुमूल्य योगदान दिले. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अभोगी (गगनगंधा), एकच प्याला (सिंधू), कान्होपात्रा (कान्होपात्रा), द्रौपदी (द्रौपदी), भेटता प्रिया, (महाश्वेता), मंदोदरी (मंदोदरी), मानापमान (भामिनी), मृच्छकटिक (वसंतसेना), ययाति आणि देवयानी (शर्मिष्ठा), रंगात रंगला श्रीरंग (माधवी), रामराज्यवियोग (मंथरा), रूपमती (रूपमती), विद्याहरण (देवयानी), शाकुंतल (शकुंतला), शारदा (शारदा), श्रीरंग प्रेमभंग (राधा), संशयकल्लोळ (रेवती), सौभद्र (कृष्ण, नटी, नारद, रुक्मिणी, सुभद्रा), स्वयंवर (रुक्मिणी), स्वरसम्राज्ञी (मैनाराणी) ही काही त्यांची गाजलेली नाटकं आजही रसिकांच्या स्मरणात आहेत.

गोड गळा आणि शास्त्रीय संगीतासाठी केलेल्या प्रचंड परिश्रमामुळे कीर्ती शिलेदार यांनी संगीत मराठी नाटकात केलेल्या सर्वच भूमिका गाजल्या.  त्यांचं शास्त्रीय संगीताचं उच्च शिक्षण नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्याकडे झालं. कीर्ती शिलेदार यांना २०१४ सालचा महाराष्ट्र सरकारचा अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार तसेच दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा विशेष पुरस्कार आणि बालगंधर्व पुरस्कार मिळाला आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

 

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.