आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं सगळीकडे आता हिरव्या रंगाची उधळण आणि वातावरण प्रसन्न झालं आहे. या प्रसन्न वातावरणासारखच आनंद देणारं, “झिम्माड” हे श्रवणीय गीत नुकतेच झी म्युझिक मराठीच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आले आहे. गायिका अमृृृता नातूनं हे गाणं संगीतबद्ध करून गायलं आहे. (Music video of Zimmad sung by Amruta Natu)

गायिका आणि संगीतकार अमृता नातूनं आतापर्यंत सिंगल म्युझिक व्हिडिओतून वेगवेगळ्या प्रकारची गाणी केली आहेत. “झिम्माड” हे गाणंही असंच श्रवणीय आणि आनंददायी आहे. सुचेता जोशी अभ्यंकर यांच्या शब्दांना अमृतानं संगीतबद्ध करून गायलं आहे. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आणि पोस्ट प्रोडक्शन अजिंक्य देशमुखनं केलं आहे. संतोष नायर यांनी संगीत संयोजन, प्रोग्रॅमिंगची जबाबदारी निभावली आहे. उत्तम शब्द, रिफ्रेशिंग चाल, नेत्रसुखद छायांकन ही या म्युझिक व्हिडिओची वैशिष्ट्य आहेत.

म्युझिक व्हिडिओविषयी गायिका-संगीतकार अमृता नातू म्हणाली, “सध्या नकारात्मक परिस्थिती असली तरी निसर्ग दरवर्षीप्रमाणेच प्रसन्न आहे. पावसानं हिरवाई दाटली आहे, रिफ्रेशिंग वातावरण आहे. हे वातावरण शब्द, संगीत आणि छायांकनातून टिपलं आहे. त्यामुळे रसिकांना याच रिफ्रेशिंग वातावरणाचा अनुभव आणि आनंद देण्याचा प्रयत्न या म्युझिक व्हिडिओद्वारे केला आहे.”

Song Link –

 

हेही वाचा – ‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने सुरू होतेय ‘कडक भक्ती’ची नवी वाटचाल

Website | + posts

Leave a comment