आज आपल्या वाढदिवासाच्या निमित्ताने अभिनेता कार्तिक आर्यन ने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव आहे ‘धमाका’. आपल्या ट्विटर हॅण्डलवरून कार्तिकने ही घोषणा केली. राम माधवानी या चित्रपटाचे निर्माता-दिग्दर्शक आहेत. रॉनी स्क्रूवाला हे सुद्धा चित्रपटाचे सह-निर्माते आहेत. कार्तिकने चित्रपटाची घोषणा करतांना त्याचे फर्स्ट लूक पोस्टर प्रकाशित केले आहे. या सिनेमाचे शूटिंग पुढील महिन्यापासून सुरु होणार असून २०२१ साली हा चित्रपट प्रदर्शित होईल. ‘धमाका’ हा साऊथ कोरियन चित्रपट ‘दि टेरर लाईव्ह’ चा हा रिमेक असल्याचे कळते.
निर्माता-दिग्दर्शक राम माधवानी यांनी आपल्या ट्विटर हॅन्डल वर पोस्ट केलेला टिझर फर्स्ट लूक व्हिडीओ आपण खाली बघू शकता

Website | + posts

Leave a comment